तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:25 IST2024-12-13T12:22:42+5:302024-12-13T12:25:36+5:30
बॉलीवूडचा सुपरस्टार, अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) विविध धाटणीच्या भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम
Aamir Khan: बॉलीवूडचा सुपरस्टार, अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) विविध धाटणीच्या भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. अभिनेत्याची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. त्याच्या चित्रपटांची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, २०२२ मध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर आता जवळपास २ वर्षानंतर अभिनेता मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. आमिर खान 'कुली' या साउथ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात जवळपास ३० वर्षानंतर आमिर खान आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची ही जणू पर्वणीच ठरणार आहे. 'आतंक-आतंक' चित्रपटानंतर 'कुलीम'ध्ये आमिर-रजनीकांत स्क्रीन शेअर करणार असल्याचं कळतंय. तसेच आमिर खान या सिनेमात कोमिओ करण्याची असल्याची चर्चा आहे. आमिर खानच्या आगमी सिनेमामध्ये साउथ अभिनेत्री श्रुती हसन अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगला जयपूरमध्ये सुरूवात करण्यात आली आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कुली'मध्ये अभिनेते रजनीकांत देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आमिर खान आणि श्रुती हसन पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
दाक्षिणात्य दिग्दर्शक लोकेश नागराज हे 'कुली' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. लोकेश नागराज यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत 'विक्रम', 'कैथी' आणि 'लियो' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. 'कुली' सिनेमा येत्या २०२५ मध्ये जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.