या कारणामुळे अभिनय क्षेत्रात नाही आली आमिर खानची लेक आयरा; म्हणाली- "अभिनेत्री होणं म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 11:24 AM2024-12-07T11:24:13+5:302024-12-07T11:30:41+5:30

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खानचे जगभरात चाहते आहेत.

bollywood actor aamir khan daughter ira khan reveals about why she did not choose acting career know the reason | या कारणामुळे अभिनय क्षेत्रात नाही आली आमिर खानची लेक आयरा; म्हणाली- "अभिनेत्री होणं म्हणजे..."

या कारणामुळे अभिनय क्षेत्रात नाही आली आमिर खानची लेक आयरा; म्हणाली- "अभिनेत्री होणं म्हणजे..."

Aamir khan Daughter: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खानचे (Aamir khan) जगभरात चाहते आहेत. जवळपास तीन दशकं सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या या अभिनेत्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, आमिर खानबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफ अली खान, श्रीदेवी यांच्या मुलांप्रमाणेच अभिनेत्याची मुले देखील त्याच्या पाऊलांवर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरतील असा अंदाज  त्याच्या चाहत्यांनी बांधला. नुकतंच आमिरच्या मुलाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. परंतु त्याची मुलगी आयरा (ira Khan) बॉलिवूडच्या ग्लॅमरपासूनच चार हात लांबच राहणं पसंत करते. यावर नुकतीच आमिर खानची लेक आयराने भाष्य केलं आहे.

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा सध्या चर्चेत आली आहे. 'रेडिटवरील आस्क मी एनिथिंग' या सेशनमध्ये आयरा खानने अभिनय क्षेत्रात करियर न करण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. काल ६ डिसेंबरच्या दिवशी आयरा खान 'एएमए सेशन' ऑनलाइन होस्ट केला. या सेशनमध्ये तिने मानसिक आजाराबद्दलही सांगितलं. त्याचदरम्यान आयराला तिने अभिनय क्षेत्रात करियर का केलं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की, "जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. तुम्हाला बरेच जण करियरविषयी सल्ले देत असतात. त्यावेळी तुम्ही काहीही करायला तयार असता आणि आपण किती उत्तम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो."

पुढे आयरा म्हणाली, "मी जेव्हा मोठी झाली तेव्हा मला या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. मला इतर गोष्टी करण्यात आनंद वाटायचा. मला वाटतं अभिनेत्री होणं म्हणजे फार सोप काम नाही." असं बोलून आयराने त्यांच्या शंकांचं निरसन केलं. 

Web Title: bollywood actor aamir khan daughter ira khan reveals about why she did not choose acting career know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.