जुनैद खान अन् खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज; चाहते उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:01 IST2025-01-07T11:57:21+5:302025-01-07T12:01:38+5:30
जुनैद खान आणि खुशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'लव्हयापा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जुनैद खान अन् खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज; चाहते उत्सुक
Loveyapa Trailer Release Date: फॅटम स्टुडियो आणि एजीएस एंटरटेनमेंट यांची निर्मिती असेलला 'लव्हयापा' हा सिनेमा येत्या काही दिवसांत सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan)आणि श्रीदेवी (Sridevi) यांची धाकटी मुलगी खुशी कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत चंदन यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे 'लव्हयापा'बद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यात 'लव्हयापा' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'लव्हयापा' मधील जुनैद-खुशीच्या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली. 'लव्हयापा' सिनेमाचं हे टायटल ट्रॅक असून जुनैद-खुशीच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यात आता लवकरच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. अभिनेता आमिर खानच्या हस्ते 'लव्हयापा' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार असल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या १० जानेवारी २०२५ या दिवशी 'लव्हयापा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
'लव्हयापा' हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीतने या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा हा सिनेमा आहे. शिवाय हा चित्रपट २०२२ साली आलेल्या तमिळ 'हिट लव्ह टुडे' चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.