आमिर खानच्या मुलाला झाला होता 'हा' गंभीर आजार, 'तारे जमीन पर' चित्रपटामुळे अभिनेत्याला समजलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:22 IST2025-01-06T11:17:05+5:302025-01-06T11:22:29+5:30
आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याचा आगामी चित्रपट 'लव्हयापा' मुळे चर्चेत आहे.

आमिर खानच्या मुलाला झाला होता 'हा' गंभीर आजार, 'तारे जमीन पर' चित्रपटामुळे अभिनेत्याला समजलं सत्य
Junaid Khan:बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान (Aamir Khan). अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan)याने देखील वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. २०२४ मध्ये आलेल्या 'महाराज या चित्रपटात तो झळकला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. शिवाय लवकर जुनैद त्याचा आगामी चित्रपट 'लव्हयापा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दरम्यान जुनैदने दिलेल्या एका मुलाखतीत 'तारे जमीन पर' या चित्रपटामुळे आमिर खान आणि रिना दत्ता यांना त्याला लहाणपणी झालेल्या आजाराबद्दल समजलं होतं, असा खुलासा केला आहे.
आमिर खानचा बहुचर्चित 'तारे जमीन पर' हा सिनेमा २०२७ मध्ये प्रदर्शित झाला होता. लहान मुलाच्या भावविश्वाचा उलगडा करणारा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटात डिस्लेव्हिया हा आजार असणाऱ्या एका लहान मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. दरम्यान, नुकतीच जुनैद खानने विवेक लालवानी यांच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये जुनैदने त्याला लहाणपणी झालेल्या एका आजाराबद्दल खुलासा केला. त्यावेळी तो म्हणाला, "तारे जमीन पर' चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याचे पालक आमिर खान आणि रिना दत्ता यांना त्याच्या आजाराबद्दल जाणीव झाली होती."
या मुलाखतीमध्ये जुनैदला त्याचे आई-वडील अभ्यासावरुन त्याच्याशी कसे वागायचे असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, माझ्या आई-वडिलांपैकी कोणीही अभ्यासाबाबत माझ्याशी कठोर वागले नाही. कारण मी लहान असताना त्यांना माझ्या आजाराबद्दल कळलं होतं. त्यामुळे मी सुद्धा शाळेत असल्यापासूनच याबाबत अलर्ट राहायचो."
'तारे जमीन' पर बनवण्याची कल्पना तुझ्या आजारामुळे आली का?
यावर उत्तर देताना जुनैदने सांगितलं की, मला वाटतं नाही ही पद्धत थोडी वेगळी होती. जेव्हा त्यांनी तारे जमीन पर ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा ते म्हणाले आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडताना पाहिल्या आहेत. त्यानंतर ते मला एका स्पेशलिस्टकडे घेऊन गेले मग त्यांनाही समजलं की मला डिस्लेक्सिया हा आजार आहे. आम्हाला डिस्लेक्सियाबद्दल खूप लवकर समजलं. मी जळपास ६-७ वर्षांचा असेन. त्यामुळे मोठा झाल्यानंतर मला त्याचा फार काही त्रास जाणवला नाही.