"सनी अन् बॉबी मला त्यांच्यापासून कायम दूर ठेवायचे, कारण...", अभय देओल असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:06 IST2025-03-24T12:03:51+5:302025-03-24T12:06:01+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीतील देओल कुटुंबाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

"सनी अन् बॉबी मला त्यांच्यापासून कायम दूर ठेवायचे, कारण...", अभय देओल असं का म्हणाला?
Abhay Deol : बॉलिवूड इंडस्ट्रीतील देओल कुटुंबाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेते धर्मेंद यांच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दोन्ही मुले सनी देओल (sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. परंतु देओल कुटुंबातील आणखी एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. हा अभिनेता म्हणजे अभय देओल. अभय आपले चुलत भाऊ सनी देओल आणि बॉबी देओलसारखा बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या अभय देओल त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने आपल्याला फिल्मी करिअरविषयी तसेच सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं.
नुकतीच अभय देओलने 'इंडियन एक्सप्रेस'च्या 'स्क्रीन लाईव्ह' या कार्यक्रमात हजेरी लावली त्या दरम्यान अभिनेत्याने सांगितलं की एक सामान्य मुलांप्रमाणे आपलं संगोपन झालं. तेव्हा संपूर्ण देओल कुटुंब एकत्र राहायचं. सनी देओल आणि बॉबी देओलही त्याच घरात वाढले. त्यावेळी चुलत भावांसोबत आपलं नातं कसं होतं? याबाबत अभय देओल म्हणाला, "त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. परंतु ते माझ्यापासून थोडे लांब असायचे. मी घरी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे सगळ्यांनी लाड केले, हट्ट पुरवले. पण, ते दोघेही मला त्यांच्यापासून लांब ठेवायचे. कारण मी तेव्हा प्रचंड मस्ती करायचो."
पुढे अभिनेत्याने सांगितलं की, "परंतु त्या दोघांचा बॉण्ड खूप चांगला आहे. मी त्यांच्यासोबत फार काळ राहिलो नाही पण ते दोघे कायम एकमेकांसोबत असायचे. त्याचबरोबर माझ्या बहिणी त्यांच्यासोबत फार कनेक्टेड आहेत." असा खुलासा अभिनेत्याने केला.
वर्कफ्रंट
अभिनेता अभय देओलने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सोचा नाथा', 'ओए लकी', 'आहिस्ता आहिस्ता','जिंदगी मिलेगी न दोबारा' तसंच 'देव डी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं.