राशा थडानीची घोडेस्वारी अन्.. ; अजय देवगणच्या बहुचर्चित 'आझाद' सिनेमाचं असं झालं शूटिंग; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:40 IST2025-01-15T15:35:54+5:302025-01-15T15:40:22+5:30

अजय देवगणच्या बहुचर्चित 'आझाद' सिनेमाचं असं झालं शूटिंग; व्हायरल होतोय VIDEO 

bollywood actor ajay devgan azaad movie bts video viral on social media starrer rasha thadani and aman devgan  | राशा थडानीची घोडेस्वारी अन्.. ; अजय देवगणच्या बहुचर्चित 'आझाद' सिनेमाचं असं झालं शूटिंग; पाहा VIDEO

राशा थडानीची घोडेस्वारी अन्.. ; अजय देवगणच्या बहुचर्चित 'आझाद' सिनेमाचं असं झालं शूटिंग; पाहा VIDEO

Azaad Movie : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'आझाद' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १७ जानेवारीला या सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, 'आझाद'च्या माध्यमातून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची लेक राशा थडानीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर 'आझाद' सिनेमाच्या शूटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. 'आयएमडीबी'द्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


'आयएमडीबी'ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आझाद सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे पडद्यामागचे क्षण दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये राशा थडानीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. शिवाय अजय देवगणने देखील शूटिंगसाठी तगडी मेहनत घेत असल्याचं दिसतंय. रणरणत्या उन्हात केलेलं शूट असो किंवा अ‍ॅक्शन सिक्वेंससाठी केलेली घोडेस्वारी हे सगळे सीन्स प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राशा आणि अमन देवगण यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आझाद' चित्रपटात अजय देवगण, राशा तडानी,अमन देवगण यांच्यासह अभिनेत्री डायना पेंटी, पियुश मिश्रा या कलाकारांचीही सिनेमात खास भूमिका आहे. १७ जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Web Title: bollywood actor ajay devgan azaad movie bts video viral on social media starrer rasha thadani and aman devgan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.