अखेर प्रतीक्षा संपली! अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार-२'  या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:08 IST2025-01-17T10:04:08+5:302025-01-17T10:08:01+5:30

'आझाद' सिनेमानंतर अजय देवगण पुन्हा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

bollywood actor ajay devgan son of sardaar 2 movie release soon date announced know about the details | अखेर प्रतीक्षा संपली! अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार-२'  या दिवशी होणार रिलीज

अखेर प्रतीक्षा संपली! अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार-२'  या दिवशी होणार रिलीज

Ajay Devgan Son Of Sardaar-2 : अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त आणि जुही चावला स्टारर सन ऑफ सरदार हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेला हा सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. शिवाय अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी सिनेरसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. आता जवळपास १२ वर्षानंतर या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सीक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, 'सन ऑफ सरदार-२' च्या घोषणेपासून प्रेक्षकांना सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

अलिकडेच अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना 'सन ऑफ सरदार-२' च्या शूटिंग संदर्भात संकेत दिले होते. चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ त्याने शेअर केला होता. सध्या यूकेमध्ये सिनेमाचं शूट सुरु झालं आहे. त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा समोर आली आहे. येत्या २५ जुलै २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित  केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 

सध्या अजय देवगण त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. 'सन ऑफ सरदार-२ ' मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. तर संजय दत्तच्या जागी रवी किशन यांची वर्णी लागली आहे. 

Web Title: bollywood actor ajay devgan son of sardaar 2 movie release soon date announced know about the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.