अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:49 IST2024-12-23T12:45:09+5:302024-12-23T12:49:05+5:30
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'आझाद'मुळे चर्चेत आहे.

अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज
Ajay Devgan:बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'आझाद'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह, डायना पेन्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या ॲक्शन जॉनर सिनेमाद्वारे अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहेत. अमन देवगण आणि राशा थडानी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, नुकताच भुवनेश्वर येथे डीवीए युनायडेट फेस्टिव्हलमध्ये जवळपास २० हजार लोकांच्या उपस्थितीत 'आझाद' चित्रपटातील नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
'आझाद' चित्रपटातील 'आझाद है तू हे' नवीन गाणं मनुष्य आणि प्राण्यांमधील एका प्रेमबंधाचं दर्शन घडवणारं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण गावरान अंदाजात पाहायला मिळतो आहे. अजय देवगणनेही सोशल मीडियावर या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. "इस कहानी की धडकन है तू, तेरी तरह ये कहानी भी आझाद है..." असं कॅप्शन देत त्याने या सोशल मीडियाद्वारे या गाण्याची झलक चाहत्यांना दाखविली आहे.
दरम्यान, 'आझाद है तू' या गाण्याला अरिजीत सिंगने सुरांचा साज चढविला आहे. तर अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं रचलं आहे. 'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. येत्या १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.