फोटोमध्ये ढोलकी वाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का? आज एका सिनेमासाठी घेतोय २५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:50 IST2023-04-18T17:49:37+5:302023-04-18T17:50:13+5:30
Bollywood actor: डोंबाऱ्याचा खेळ करत असलेला हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

फोटोमध्ये ढोलकी वाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का? आज एका सिनेमासाठी घेतोय २५ कोटी
सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांच्या कॉलेज जीवनातील वा बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी ढोलकी वाजवणाऱ्या लहान मुलगा चर्चेत आला आहे. डोंबाऱ्याचा खेळ करत असलेला हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. इतकंच नाही तर तो एका सिनेमासाठी तब्बल २५ ते ३० कोटी रुपये मानधन आकारतो.
फोटोमध्ये दिसत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अजय देवगण आहे. अजयचा हा फोटो 'प्यारी बहना' या सिनेमातील आहे. या सिनेमामध्ये त्याने मिथून चक्रवर्ती यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा अजय आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.
आजवरच्या कारकिर्दीत अजयने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अजय उत्तम अभिनेता असण्यासोबतच निर्माता आणि दिग्दर्शकदेखील आहे.फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने खऱ्या अर्थाने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम,दृश्यम, दृश्यम २, भोला यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये तो झळकला आहे.