ढील दे दे रे भैय्या...! मकरसंक्रांतनिमित्त अक्षय कुमारची पतंगबाजी तर परेश रावल यांच्या हातात मांजा, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:40 IST2025-01-14T17:37:08+5:302025-01-14T17:40:54+5:30
अक्षय कुमार अन् परेश रावल यांचा मनमौजी अंदाज; 'भूत बंगला'च्या सेटवर केली पतंगबाजी

ढील दे दे रे भैय्या...! मकरसंक्रांतनिमित्त अक्षय कुमारची पतंगबाजी तर परेश रावल यांच्या हातात मांजा, पाहा व्हिडिओ
Akshay Kumar Video: संपूर्ण देशभरात आज मकर संक्रांतीच्या (Makar Sankaranti) सणाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हा सण साजरा करताना दिसतो आहे. सेलिब्रिटी मंडळीही यात कुठे कमी नाही. दरम्यान, मकर संक्रांतीच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) पतंग उडवताना दिसतो आहे. त्याचबरोबर सोबतीला अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) देखील दिसत आहेत.
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' मुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार 'भूत बंगला' निमित्त अनेक वर्षांनी हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. दरम्यान, 'भूत बंगला' च्या सेटवर अक्षय कुमार पतंग उडवत आहे तर अभिनेते परेश रावल यांच्या हातात मांजा दिसतोय. व्हिडीओमध्ये अक्षयचा असा मनमौजी अंदाज पाहून त्याचे चाहते देखील खुश झाल्याचे पाहायला मिळत आहेत. "माझे मित्र परेश रावल यांच्यासोबत 'भूत बंगला' चित्रपटाच्या सेटवर मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहे. तुम्ही सतत हसत राहा, चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या त्यासोबतच पतंगाप्रमाणे उंच भरारी घ्या... प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा... सर्वांना पोंगल, उत्तरायण आणि बिहूच्या शुभेच्छा! "अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केल्याची पाहायला मिळतेय.
'भूत बंगला' कधी रिलीज होणार?
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'भूत बंगला'ची रिलीज डेट काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलीय. 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही महिने वाट बघावी लागणार आहे. 'भूत बंगला' सिनेमा २ एप्रिल २०२६ ला रिलीज होणार आहे. म्हणजेच 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 'भूत बंगला'चं नवं पोस्टर शेअर करुन अक्षयने ही आनंदाची बातमी सर्वांना दिलीय. आता 'भूत बंगला'च्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे.