कथ्थक नृत्य अन्...; 'केसरी-२' मधील अक्षय कुमारच्या नव्या लूकची चर्चा, पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:15 IST2025-04-09T14:11:40+5:302025-04-09T14:15:45+5:30
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं.

कथ्थक नृत्य अन्...; 'केसरी-२' मधील अक्षय कुमारच्या नव्या लूकची चर्चा, पोस्ट व्हायरल
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अक्षय कुमार हा विविध विषय असलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी-२' मुळे चर्चेत आहे. 'केसरी-२' मध्ये अक्षय कुमारसोबत आर. माधवन (R.Madhvan) आणि अनन्या पांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. येत्या १८ एप्रिलला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. याचदरम्यान, अक्षय कुमारचा चित्रपटातील त्याच्या भूमिकेशी संबंधित असलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील अभिनेत्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
नुकतीच सोशल मीडियावर अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील अभिनेत्याच्या नव्या लूकची प्रचंड चर्चा होताना दिसते आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो कथ्थक नृत्य करताना दिसत आहे. याशिवाय हेवी मेकअप, लांब नखे आणि लक्षवेधी पोशाख असा लूक पाहायला मिळतोय. अक्षयला या फोटोमध्ये ओळखणं कठीण झालं आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलंय की, "हा फक्त पोशाख नाही.' ते माझ्या राष्ट्राच्या परंपरेचे, प्रतिकाराचे, सत्याचे प्रतीक आहे.सी शंकरन नायर शस्त्रांनी लढले नाहीत. त्यांनी कायद्याच्या आधारे ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला. येत्या १८ एप्रिलला आम्ही तुमच्यासमोर एका न्यायालयीन सुनावणी घेऊन येत आहोत. ज्याबद्दल तुम्हाला पाठ्यपुस्तकात शिकवलं गेलं नाही...," अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.
'केसरी-२' या चित्रपटात अक्षय कुमार सी. शंकर नायर यांची भूमिका साकारत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये १९१९ च्या जालिनवाला हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढा देणाऱ्या सी. शंकर.नायर यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.