दिवसभरात ३०-४० कप चहा प्यायचा 'हा' अभिनेता; दुधासाठी सेटवर बांधून ठेवायचे म्हशी, वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:05 PM2024-09-23T15:05:38+5:302024-09-23T15:09:06+5:30
कोणत्याही गोष्टीची सवय ही अतिरिक्त प्रमाणात झाली तर ती सवय मोडणं अनेकदा कठीण होऊन बसतं.
Amjad khan Unknown Story: कोणत्याही गोष्टीची सवय ही अतिरिक्त प्रमाणात झाली तर ती सवय मोडणं अनेकदा कठीण होऊन बसतं. याचंच उदाहरण म्हणजे चहाप्रेमी. चहा ही आपल्याकडे अमृतासारखी गोष्ट समजली जात असून सकाळी उठल्यावर अनेकांना सगळ्यात आधी चहा लागतो. कधी एखाद्याला भेटायचे असेल किंवा कोणाच्या घरी गेलो की अगदी अवश्य घेतली जाणारी गोष्ट म्हणजे चहा. काहींना एकवेळचा चहा जरी मिळाला नाही तर त्यांना अक्षरश: बेचैन वाटतं. अशाच चहाप्रेमी अभिनेत्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' हा चित्रपट बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांपैकी एक समजला जातो. १९७५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेते अमिताभ बच्चन तसेच धर्मेंद्र या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसले. पण, असं असलं तरी 'शोले'मध्ये खलनायकाची भूमिका साकारून भाव खाऊन गेले ते अभिनेते अमजद खान. या चित्रपटात त्यांनी साकारलेला 'गब्बर सिंग' आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. चित्रपटात व्हिलन साकारणारे अमजद खान एक चहाप्रेमी असल्याचं सांगितलं जातं. फक्त एक दिवस त्यांना सेटवर चहा मिळाला नाही तर त्यांनी असं काही केलं की त्याचा विचार कोणीही करू शकत नाही.
चहाप्रेमी होते अमजद खान-
अमजद खान खऱ्या आयुष्यात अतिशय विनोदी स्वभावाचे होते. पण, त्यांना आणखी एक व्यसन होतं, ते म्हणजे चहाचं. त्याना येता जाता त्यांना चहा लागायचा. त्यांचं हे चहाचं व्यसन माहित असल्याने शूटींगदरम्यान त्याच्या चहाची खास व्यवस्था असायची. दिवसभरात ३० ते ४० कप चहा लागायचा.
दरम्यान, पृथ्वी थिएटरमध्ये एका नाटकाची तालीम सुरु होती. त्यावेळी त्यांनी चहा मागितला. पण बराच वेळ झाला तरी चहा काही मिळाला नाही. त्यानंतर अमजद खान यांनी तेथील स्टाफला चहा न मिळण्याचं कारण विचारलं. तेव्हा चहासाठी दूध नसल्यामुळे त्यांना चहा मिळाला नाही असं सांगितलं गेलं. फक्त एक दिवस चहा मिळाला नाही म्हणून अमजद खान प्रचंड अस्वस्थ झाले. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सेटवर चक्क दोन म्हशी घेऊन गेले. चहासाठी दुध कमी पडू नये त्यांनी सेटवर म्हशी बांधून ठेवल्या. आता दिवसभर चहा मिळायला हवा, असं त्यांनी तेथील स्टाफला ठणकावून सांगितलं. त्यांच्या या कृतीने सेटवर एकच हशा पिकला.