"तोपर्यंत भारतात कॉन्सर्ट करणार नाही...", दिलजीत दोसांझचा मोठा निर्णय; व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:10 IST2024-12-17T09:07:11+5:302024-12-17T09:10:00+5:30
लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh) लाईव्ह कॉन्सर्ट सध्या जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत.

"तोपर्यंत भारतात कॉन्सर्ट करणार नाही...", दिलजीत दोसांझचा मोठा निर्णय; व्यक्त केली नाराजी
Diljit Dosanjh: लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh) लाईव्ह कॉन्सर्ट सध्या जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' च्या माध्यमातून दिलजीत भारतासह जगभरात ठिकठिकाणी कॉन्सर्ट करतो आहे. त्यामुळे दिलजीतच्या कॉन्सर्टला चाहत्यांचाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. सध्या दिलजीत भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करण्यात व्यस्त आहे. परंतु त्याचे कॉन्सर्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच दिलजीत दोसांझच्या दिल-ल्यूमिनाटी टूरचा एक कॉन्सर्ट चंदीगडमध्ये पार पडला. त्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतच्या एका निर्णयाने त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला.
दरम्यान, सोशल मीडियावर दिलजीत दोसांझचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओबद्दल सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. दिलजीत दोसांझने या व्हिडीओच्या माध्यमातून दिलजीत यापुढे भारतात कोणताही कॉन्सर्ट करणार नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. शिवाय त्याने व्हिडीओमध्ये देशात असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव या गोष्टींवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिलजीत म्हणतो, "मला प्रशासनाला सांगावंस वाटतं की आपल्याकडे अशा पद्धतीचे लाईव्ह कॉन्सर्ट करण्यासाठी पायाभूत सुविधा फार कमी आहेत. शिवाय अशा कॉन्सर्टमुळे अनेक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात आणि यामुळे अनेकांना रोजगारही मिळतो. कृपया या गोष्टींकडे लक्ष द्या."
पुढे दिलजीत म्हणाला, "लाईव्ह कॉन्सर्टच्या मध्यभागी माझ्या कार्यक्रमाचा स्टेज असावा आणि आजुबाजूला माझे प्रेक्षक, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल, असा माझा विचार आहे. जोपर्यंत या परिस्थितीवर काही तोडगा निघत नाही तोपर्यंत मी भारतात कॉन्सर्ट करणार नाही.
सोशल मीडियावरही दिलजीत दोसांझने त्याच्या चंदीगढ टुरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत." तुम्ही मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीही मी इथे आलोच. चंदीगढ हे मॅजिकल शहर आहे. दिल ल्यूमिनाटी टूर २०२४"असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.