अर्जुन कपूरच्या बहिणीने पहिल्यांदाच केलं आई-वडिलांच्या घटस्फोटावर मोठं भाष्य; म्हणाली- "त्यावेळी काय बोलावं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:55 PM2024-11-15T12:55:13+5:302024-11-15T12:58:18+5:30
अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि मोनी कपूर यांची मुलं आहेत.
Anshula Kapoor:अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि मोनी कपूर यांची मुलं आहेत. कपूर कुटुंबातील प्रत्येकजण सिनेविश्वात सक्रीय असला तरी अंशुलाने अभिनयापासून चार हात लांब राहणंच पसंत केलं. पण, सध्या अंशुला तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखती दरम्यान तिने आई-वडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य केलं.
नुकतीच अंशुलाने ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने अनेक खुलासे केले. "९० च्या दशकात माझा जन्म झाला, त्याकाळात मी वाढले. त्यावेळी आई-वडील वेगळे होत असताना नेमकं काय बोलावं हेच कळत नव्हतं. लोकं माझी कौंटुंबिक मूल्ये तसेच संगोपन याबाबतीत चर्चा करायचे. त्यानंतर मी या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले".
पुढे अंशुला म्हणाली, "मी कपूर कुटुंबात लहानाची मोठी झाले. तेव्हा आमचं कुटुंब एकत्र होतं आणि माझी आजी घर चालवायची. अर्थातच तेव्हा आई-बाबा काम करायचे, संजू काका देखील काम करत होते. परंतु, जेव्हा आम्ही आईसोबत ते घर सोडलं त्यानंतर सगळी जबाबदारी तिच्यावर आली. आपल्या आईचं कौतुक करत अंशुलाने सांगितलं, ती काळजी घेणारी, प्रेम करणारी समस्यांतून मार्ग काढणारी शिवाय कमावणारीही तिच होती. तिचं आमची आई आणि बाबा होती. तेव्हा असं वाटायचं आमची काळजी घेण्यासाठी तिच्याकडे दहा होते". असं अंशुलाने सांगितलं.
दरम्यान, अर्जुन कपूरची आई मोना कपूर याचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. श्रीदेवी प्रेमात असलेल्या बोनी कपूर यांचं पहिलं लग्न झालं होतं व त्यांना दोन मुलंदेखील होते. परंतु १९९६ श्री देवी आणि बोनी कपूर यांनी लग्नगाठ बांधली आणि अभिनेत्रीसोबत संसार थाटला. त्यावेळीच त्यांनी मोना कपूर यांच्यासोबतच्या नात्याला पूर्णविराम दिला.