प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:24 PM2024-11-02T13:24:07+5:302024-11-02T13:24:51+5:30
ही कहाणी अशा एका बॉलिवूड सुपरस्टारची जो प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने गर्लफ्रेंडपासून दूर गेला होता. पण पुढे त्याला जाणीव झाली
अनेक बॉलिवूडमधील कलाकार असे आहेत जे सुरुवातीला स्ट्रगल करताना दिसतात. परंतु नंतर हे कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर गेल्यावर आपल्या आयुष्यातील जुन्या व्यक्तींना ते विसरतात. अनेक कलाकारांच्या लव्ह लाईफमध्येही गोंधळ निर्माण होतो. पुढे ब्रेकअप, घटस्फोट अशा गोष्टी घडताना दिसतात. परंतु काही कलाकार असेही असतात जे आजन्म एका व्यक्तीशी निष्ठावंत राहतात आणि लग्न टिकवतात. ही कहाणी अशाच एका कलाकाराबद्दल त्याचं नाव आयुषमान खुराना.
प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली अन्
आयुषमान खुरानाच्या लग्नाला आज १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु एक काळ असा आला होता प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन जिच्याशी आयुषमानने लग्न केलेलं तिच्यापासून तो कायमचा दूर जाणार होता. मेशेबल महफिलला दिलेल्या मुलाखतीत आयुषमान म्हणाला की, "रोडीज जिंकल्यावर मी चंदीगडमध्ये खूप लोकप्रिय झालो. मला लोकांचं आणि मुलींचं प्रेम मिळत होतं. या गोष्टीमुळे माझी मती भ्रष्ट झाली. त्यामुळे मी ताहिरासोबत तब्बल ६ महिने अंतर ठेऊन होतो. कारण मला आयुष्य जगायचं होतं. परंतु नंतर मला जाणीव झाली आणि मी पुन्हा ताहिराजवळ गेलो."
आयुषमानच्या लग्नाला झाली १६ वर्ष
आयुषमान खुरानाने २००४ साली रोडीज हा टीव्ही शो जिंकला होता. त्यानंतर प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने आयुषमान ताहिरासोबत ब्रेकअप करणार होता. परंतु नंतर अभिनेत्याला चुकांची जाणीव झाली. २००८ ला आयुषमान ताहिरा या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. २०१२ साली 'विकी डोनर' सिनेमातून आयुषमानने बॉलिवूड पदार्पण केलं. २०१९ ला आयुषमानची पत्नी ताहिराला कॅन्सरचं निदान झालं. परंतु नंतर ताहिराने कॅन्सरवर यशस्वी मात केली. आज आयुषमान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून पुढील वर्षी त्याचा रश्मिका मंदानासोबत 'थामा' हा सिनेमा रिलीज होणार आहे.