बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:10 IST2025-02-10T18:07:07+5:302025-02-10T18:10:40+5:30
'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात.

बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर
Vicky Kaushal At Golden Temple:विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'छावा' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाच्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुलाखती देत आहेत. शिवाय चित्रपटाच्या यशासाठी परमेश्वराकडे प्रार्थना देखील करताना दिसत आहेत.
अलिकडेच विकी कौशल 'छावा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या विकी कौशल संभाजीनगर येथे पोहोचला आहे. या शुभकार्याची सुरुवात अभिनेत्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत केली आहे. त्यानंतर आता अभिनेत्याने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात पोहोचला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन सुद्धा पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर विकी कौशलचे व्हायरल होणारे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विकी कौशलने देखीस आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सुवर्णमंदिराला भेट दिल्याचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सुवर्णमंदिराला हात जोडून प्रार्थना करताना दिसतो आहे. या फोटोंमधील विकी-रश्मिकाचा साधेपणा सुद्धा अनेकांना भावला आहे. दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला 'छावा' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता देखीस शिगेला पोहचली आहे.