विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:21 IST2025-02-19T09:13:09+5:302025-02-19T12:21:45+5:30
Vicky Kaushal to Visit Raigad: विकी कौशलने दिलेला शब्द पाळला, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..."

विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-"आपलं दैवत..."
Shiv Jayanti Celebration at Raigad: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट नुकताच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते. या चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे विकी कौशलच्या पाठीवर प्रेक्षक कौतुकाची थाप देत आहेत. दरम्यान,आता चित्रपटाला मोठे यश मिळत असतानाच अभिनेता विकी कौशलच्या एका कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच अभिनेत्याने शिवजयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोठी घोषणा केली आहे.
विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने शिवजयंतीच्या दिवशी आपण रायगडावर जाणार असल्याचं सांगितलं आहे. 'छावा'च्या प्रमोशनदरम्यान विकी कौशल वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती तसेच भेटीगाठी देताना दिसला. त्यादरम्यान बऱ्याच ठिकाणी अभिनेत्याने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रायगडावर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर विकीने आपला दिलेला शब्द पाळला आहे. आज १९ फेब्रुवारीला ३९५ व्या शिवजयंतीनिमित्त तो किल्ले रायगडावर जाणार आहे. आपल्या इन्स्टाग्रावर स्टोरीच्या माध्यमातून त्याने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, "नमस्कार...! उद्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी विकी कौशल स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडावर जात आहे. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषाने साजरी करूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे'. असं म्हणत हा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. याशिवाय 'जय भवानी जय शिवराय' असं कॅप्शनही त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. पाच दिवसात सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. सध्या जो तो याच सिनेमाबद्दल बोलताना दिसतोय. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला त्याने न्याय दिला आहे. लक्ष्मण उतेकरांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.