आयुष्यावर बायोपिक आला तर कोणी भूमिका साकारावी? धर्मेंद्र यांनी सनी-बॉबीचं नाव न घेता 'या' अभिनेत्याला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:00 IST2024-12-09T13:58:22+5:302024-12-09T14:00:12+5:30

स्वतःच्या आयुष्यावर बायोपिक आलाच तर धर्मेंद्र यांनी या अभिनेत्याच्या नावाला दिली पसंती. काय म्हणाले बघा

bollywood actor dharmendra want salman khan doing his role in biopic | आयुष्यावर बायोपिक आला तर कोणी भूमिका साकारावी? धर्मेंद्र यांनी सनी-बॉबीचं नाव न घेता 'या' अभिनेत्याला दिली पसंती

आयुष्यावर बायोपिक आला तर कोणी भूमिका साकारावी? धर्मेंद्र यांनी सनी-बॉबीचं नाव न घेता 'या' अभिनेत्याला दिली पसंती

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं खूप फॅन फॉलोईंग आहे. वयाची ८० वर्ष ओलांडली तरीही धर्मेंद्र यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. धर्मेंद्र आजही मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. गेल्या दोन वर्षात धर्मेंद्र यांचे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक आला तर कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारलेली त्यांना आवडेल यावर धर्मेंद्र यांनी त्यांंचं मत मांडलंय.

माझ्यावर बायोपिक आला तर..: धर्मेंद्र

काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांनी खुलासा केला की, त्यांच्यावर बायोपिक आला तर कोणत्या अभिनेत्याने त्यांची भूमिका साकारलेली आवडेल. यावर धर्मेंद्र त्यांची मुलं अर्थात सनी, बॉबी देओलकडे बोट दाखवतील अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु दोन मुलांना निवडण्याऐवजी धर्मेंद्र यांनी सलमान खानचं नाव घेतलं. माझ्या बायोपिकसाठी सलमान हा चांगला ऑप्शन असेल, असं धर्मेंद्र म्हणाले.

२०१८ मध्ये दिलेेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांना याविषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले की, "मला वाटतं की सलमान खान माझ्या बायोपिकमध्ये माझी भूमिका चांगली करु शकेल. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. याशिवाय सलमानच्या काही सवयी माझ्यासारख्या आहेत. तुम्ही सर्व सलमान आणि चांगल्या सवयींना चांगलंच ओळखता." अशाप्रकारे धर्मेंद्र यांनी त्यांच्या बायोपिकमध्ये सलमान खानने भूमिका करायची इच्छा व्यक्त केलीय.

 

Web Title: bollywood actor dharmendra want salman khan doing his role in biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.