गोविंदाने का नाकारली होती संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची ऑफर; 'हे' होतं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:08 IST2025-01-06T10:06:26+5:302025-01-06T10:08:47+5:30

संजय लीला भन्साळींनी गोविंदाला दिली होती 'देवदास'ची ऑफर, अभिनेत्याने 'या' कारणामुळे दिला नकार 

bollywood actor govinda wife sunita reveals in interview about why he was rejected chunnilal role in devdas movie know the reason | गोविंदाने का नाकारली होती संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची ऑफर; 'हे' होतं कारण 

गोविंदाने का नाकारली होती संजय लीला भन्साळींच्या 'देवदास'ची ऑफर; 'हे' होतं कारण 

Govinda Rejected Devdas Film: बॉलिवूडमध्ये ८० ते ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. दरम्यान, अभिनेता सिनेसृष्टीत सध्या सक्रिय नसला तरी त्याची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. जवळपास ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेत्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा कधी गोविंदाचं नाव काढलं जातं तेव्हा त्याच्या 'राजा बाबू', 'कुली नं-१', 'जिस देश में गंगा रहता है' आणि 'भागम भाग' हे चित्रपटातील दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात. परंतु गोविंदाने एका वेळेस चक्क संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. नेमकं असं काय घडलं होतं? जाणून घेऊया. 

अभिनेता गोविंदाने बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटाची ऑपर नाकारली होती. याचा खुलासा अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीता यांनी गोविंदाबद्दल अनेक गोष्टींचे खुलासे केले. त्यादरम्यान सुनीता अहुजा म्हणाल्या, "गोविंदा एक नावाजलेला अभिनेता आहे आणि तो चित्रपटांमध्ये सेकंड रोल का करेल. तुम्ही त्याला चुन्नीलाल वगैरे अशा भूमिका करायला नाही सांगू शकत. त्यामुळे हा सिनेमा त्याने नाही केला. तो त्याचा निर्णय होता. त्यांना वाटलं की गोविंदा सध्या सिनेमे करत नाही म्हणून तो कदाचित या भूमिकेसाठी तयार होईल."

पुढे त्या म्हणाल्या, "गोविंदा ८०ते ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो सुपरस्टार आहे. त्यामुळे त्याने चित्रपटाची ऑफर नाकारली. पण, त्याच्याजागी जर मी असते तर माहित नाही माझ्या तोंडून काय निघालं असतं."असा खुलासा त्यांनी केला. 

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. देवदासमध्ये अभिनेता शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांसारखी तगडी स्टार होती. या चित्रपटात चुन्नीलाल ची भूमिका जॅकी श्रॉफ यांनी वठवली. परंतु जॅकी श्रॉफ यांच्याआधी या चुन्नीलाल हा रोल गोविंदाला ऑफर करण्यात आला होता. 

Web Title: bollywood actor govinda wife sunita reveals in interview about why he was rejected chunnilal role in devdas movie know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.