"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:58 IST2025-01-07T10:53:44+5:302025-01-07T10:58:47+5:30
राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है हा सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित
Kaho Na Pyaar Hai: राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है हा सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. जवळपास दोन दशकानंतरही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून इतिहास घडवला होता. 'कहो ना प्यार है' मध्ये हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) अभिनेत्री अमिषा पटेलही (Ameesh Patel) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. आपल्या करिअरमधील पहिल्या डेब्यू फिल्मने हृतिक-अमिषाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. परंतु आता तब्बल २५ वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये पुन प्रदर्शित करण्यात येणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
येत्या १० जानेवारीला म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनच्या वाढदिवशी कहो ना प्यार हो हा सिनेमा रि-रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत सिनेरसिक देखील उत्सुक झाले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी है दिवानी' थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळतोय. त्यातच 'कहो ना प्यार है' च्या पुन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
फक्त १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'कहो ना प्यार है' हा चित्रपटाने त्याकाळी जगभरात ७८.९३ कोटींचा गल्ला जमावला होता. अभिनेते अनुपम खेर, फरीदा जलाल, सतीश शाह., मोहनाश बहल यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाची चित्रपटाची कथा, त्यामधील गाणी, शिवाय कलाकार या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली.