रात्री उशिरा रस्त्यावर 'या' व्यक्तीसोबत दिसून आली हृतिक रोशनची एक्स पत्नी; समोर आला असा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 22:31 IST2022-03-28T22:30:27+5:302022-03-28T22:31:41+5:30
यावेळी सुझैन आणि अर्सलान कॅमेऱ्याची पर्वा न करता एकमेकांना मिठी मारताना आणि किस करतानाही दिसले.

रात्री उशिरा रस्त्यावर 'या' व्यक्तीसोबत दिसून आली हृतिक रोशनची एक्स पत्नी; समोर आला असा VIDEO
सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझैन खान घटस्फोटानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यात मुव्ह ऑन झाले आहेत. तरी हे दोघेही मुलांसाठी एकत्रितपणे कौटुंबिक वेळही घालवताना दिसत असतात. यातच, आता सुझैन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. सुझैनचा हा व्हिडिओ पेपराजीने तिला स्पॉट करताना शूट केला आहे.
पार्टीनंतरचा व्हिडिओ -
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, पार्टीनंतर सुझैन तिच्या मित्रांसोबत स्पॉट झाली आहे. यादरम्यान, ती तिच्या कारकडे जाण्यापूर्वी, सर्वांना सी ऑफ करताना दिस आहे. मात्र सुझैन आणि अर्सलान यांचा एकमेकांचा निरोप घेण्याचा अंदाज काही खास आहे आणि दोघांच्या जवळीकतेसंदर्भातही बरेच काही सांगून जातो.
कॅमेऱ्यासमोर केलं किस -
यावेळी सुझैन आणि अर्सलान कॅमेऱ्याची पर्वा न करता एकमेकांना मिठी मारताना आणि किस करतानाही दिसले. जेव्हा अर्सलानने तिला कारमध्ये बसवले आणि कार पुढे जाऊ लागली तेव्हाही सुझान त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली.
नेटिझन्स अवाक -
या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून नेटिझन्स कमेंट सेक्शनमध्ये आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पेपराजी विरल भयानीने शेअर केला आहे. सुझैन आणि अर्सलान गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचेही वृत्त आहे. मात्र, या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कसल्याही प्रकारचे जाहीर भाष्य केलेले नाही. पण ते सोशल मीडियावर अनेकवेळ एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहे.
कोण आहे अर्सलान गोनी?
अर्सलान हा 'बिग बॉस 14' चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ आहे. अर्सलानने काही दिवसांपूर्वीच अल्ट बालाजीची वेब सीरिज 'मैं हिरो बोल रहा हूँ' साइन केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, 42 वर्षीय सुझैन गेल्या एक वर्षापासून अर्सलानला ओळखते.