हृतिक रोशनची Ex पत्नी सुझैन खानने मुंबईत भाड्याने घेतला आलिशान फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:00 IST2024-12-28T11:58:55+5:302024-12-28T12:00:59+5:30

बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता हृतिक रोशनची  (Hrithik Roshan) पुर्वाश्रमीची पत्नी कायमच चर्चेत येत असते.

bollywood actor hrithik roshan ex wife sussanne khan took a luxurious flat on rent in mumbai know about per month rent | हृतिक रोशनची Ex पत्नी सुझैन खानने मुंबईत भाड्याने घेतला आलिशान फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

हृतिक रोशनची Ex पत्नी सुझैन खानने मुंबईत भाड्याने घेतला आलिशान फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

Sussanne Khan: बॉलिवूडचा हॅंडसम हंक, अभिनेता हृतिक रोशनची  (Hrithik Roshan) पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान कायमच चर्चेत येत असते. दरम्यान, सुझैन खान (Sussanne Khan) एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. सुझैन खानने नुकताच मुंबईतील जोगेश्वरी येथे एक फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती समोर येत आहे. या आलिशान फ्लॅटचं महिन्याचं भाडं लाखोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येतंय. 

मीडिया रिपोर्टनुसार, सुझैन खानने जोगेश्वरीमध्ये स्वत: साठी आलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ज्याचं प्रतिमाह भाडं २.३७ लाख रुपये आहे. या फ्लॅटचं एकूण क्षेत्रफळ २, ३२९ स्क्वेअर फूट इतकं आहे. शिवाय सुजैनने या भाड्याच्या घरासाठी स्टॅंप ड्यूटीकरिता १३,५०० रुपये दिले आहेत. शिवाय याच महिन्यात तिने या घरासाठी करार केला आहे. 

सध्या सुझैन खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सातत्याने चर्चेत येत आहे. हृतिक पुर्वाश्रमीची पत्नी तिच्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे हे चौघंही एकत्र पार्टी करतात, हँगआऊट करतात. तर हृतिक सबा आजादला डेट करत आहे. हृतिक आणि सुजैन २०१४ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. २००० मध्ये हृतिक आणि सुजैनने लग्नगाठ बांधली होती. सुखी संसारानंतर १४ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला होता.

Web Title: bollywood actor hrithik roshan ex wife sussanne khan took a luxurious flat on rent in mumbai know about per month rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.