'वॉर-२' च्या सेटवर अभिनेता हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत, काय घडलं नेमकं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:10 IST2025-03-11T10:06:17+5:302025-03-11T10:10:12+5:30
'वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'वॉर-२' च्या सेटवर अभिनेता हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत, काय घडलं नेमकं?
Hritik Roshan: 'वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक रोशन (Hritik Roshan) यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी वॉर-२ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून डान्स यांचं उत्तम समीकरण या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अशातच या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. सध्या हृतिक रोशन या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील एका गाण्यातील दृश्याचं शूटिंग करताना अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हृतिकचे चाहतेदेखील चिंतेत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर-२' मधील एका गाण्याचं शूट करत असताना हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे गाण्याचं शूटिंग थांबवण्यात आलं असून आता हे शूटिंग मे महिन्यात पुन्हा सुरु होणार असल्याची शक्यता आहे.
हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर-२' चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी देखील प्रमुख भूमिकेत आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि त्याची निर्मिती वायआरएफने केली आहे.