इमरान खान पुन्हा पडलाय प्रेमात? 'मिस्ट्री गर्ल'सोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल; चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:59 IST2024-11-09T13:54:03+5:302024-11-09T13:59:09+5:30
सध्या सोशल मीडियावर अभिनेता इमरान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

इमरान खान पुन्हा पडलाय प्रेमात? 'मिस्ट्री गर्ल'सोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल; चर्चेला उधाण
Imran Khan: 'जाने तू या जाने ना फेम' अभिनेता इमरान खान (Imran Khan) तब्बल ९ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) कमबॅक करतो आहे. अभिनेत्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते आहे. इमरान खान त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. लग्नाच्या ८ वर्षातच अभिनेत्याचा घटस्फोट झाला आणि तो इंडस्ट्रीपासून दुरावला.
सध्या अभिनेता त्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान खान सोबत मिस्ट्री गर्ल सोबत पाहायला मिळतोय. नुकताच तो एका महिलेसोबत डिनर डेटवर गेलेला दिसला. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं. ती महिला नेमकी कोण यावरुन चर्चा सुरु झाली. ती मिस्ट्री गर्ल इमरानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा पसरत आहेत. ती 'मिस्ट्री गर्ल' म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉंशिग्टन आहे. यापूर्वीही इमरान खानला 'मिस्ट्री गर्ल'सोबत अनेकदा स्पॉट झाला आहे. त्यामुळे अभिनेता या अभिनेत्रीला डेट करतोय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
इमरान खान काल मुंबईमध्ये एका थिएटरबाहेर स्पॉट झाला. त्याच्यासोबत 'मिस्ट्री गर्ल' देखील पाहायला मिळाली. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्याला दुसरं प्रेम मिळालं का? अशी चर्चा सुरू झाली आहे.