एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 02:02 PM2024-08-13T14:02:52+5:302024-08-13T14:10:43+5:30

अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत येत असतो. 

bollywood actor john abraham inspirational story know about her industry struggle and net worth | एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक

एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक

John Abraham Inspirational Story : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही सिनेविश्वात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करणं हे फार कमीच लोकांना जमलंय. बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत असे असंख्य कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाची  प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलं. अशाच एका अभिनेत्याची सध्या मनोरंजन विश्वात चर्चा रंगली आहे. हा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. 


बॉलिवूडचा हॅंडसम हंक असलेला हुरहुन्नरी अभिनेता अशी जॉन अब्राहमची ओळख आहे. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना या नायकाने आपली पाऊले बॉलिवूडकडे वळवली. फक्त नायकच नाही तर खलनायकाच्या भूमिका साकारून त्याने चाहत्यांची मनं जिंकली. सध्या अभिनेता 'वेदा' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. 

अलिकडेच जॉन अब्राहमने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे. ही गोष्ट आहे १९९९ सालची. त्यादरम्यान जॉन स्वत: वर फार कमी खर्च करायचा. अभिनेता आपल्या जेवणावर ६ रुपये २५ पैसे खर्च करत असे. २ चपात्या आणि डाळ फ्राय हा त्याचा प्रमुख आहार होता. कामाच्या वेळी सकाळी घरीच नाश्ता करायचा आणि बऱ्याचदा तो रात्रीच्या वेळेस उपाशीपोटी राहायचा. त्याकाळी जॉनकडे मोबाईलदेखील नव्हता. मुंबई लोकल ट्रेनचा पास काढून अभिनेता प्रवास करायचा. अशा आठवणी सांगत जॉन अब्राहमने त्याच्या आठवणींना उजाळा दिला.त्याचा हा प्रवास सिनेसृष्टीतील नवख्या कलाकरांना प्रेरणा देणारा ठरेल.

इतक्या संपत्तीचा मालक आहे जॉन अब्राहम- 

सध्या बॉलिवूडचा  फिटनेस हंक जॉन अब्राहम त्याच्या 'वेदा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, जॉन अब्राहम हा २५१ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेता एका फुटबॉल टिमचा मालक आहे. मुंबईतील बांद्रा येथे त्याची डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. 

जॉन अब्राहमचा सिने-इंडस्ट्रीतील प्रवास पाहिला तर त्याने २००३ मध्ये 'जिस्म' या चित्रपाटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याने आतापर्यंत 'जिस्म', 'धूम', 'जिंदा', 'दोस्ताना', 'फोर्स , 'शूटआउट अ‍ॅट वडाला', 'मद्रास कॅफे', 'पठाण' यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले.  

Web Title: bollywood actor john abraham inspirational story know about her industry struggle and net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.