कार्तिक आर्यनला बसला लाखोंचा फटका; 'Mc Laren' कारची मॅट उंदरांनी कुरतडून केला भुगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:20 PM2024-06-08T16:20:55+5:302024-06-08T16:29:18+5:30

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

bollywood actor kartik aaryan revealed in interview rats bite her mc laren gt car mat | कार्तिक आर्यनला बसला लाखोंचा फटका; 'Mc Laren' कारची मॅट उंदरांनी कुरतडून केला भुगा

कार्तिक आर्यनला बसला लाखोंचा फटका; 'Mc Laren' कारची मॅट उंदरांनी कुरतडून केला भुगा

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या काही दिवसांतच त्याच्या हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या कार्तिक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच दरम्यान अभिनेत्याने बॉलिवूड दिग्दर्शक भूषण कुमार यांनी त्याला भेट दिलेल्या लक्झरी कार संदर्भात एक खुलासा केला. 

The Lalantop ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अभिनेत्याला त्याची कार 'Mc Laren GT ' बद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी कार्तिकने सध्या तो ती कार ड्राईव्ह करत नसल्याचं सांगितलं. कार्तिक म्हणाला त्या कारची मॅट उंदारांनी कुरतडली आहे. शिवाय मुलाखतीत त्याने सांगितलं की,  "मी माझी दुसरी कार चालवतो. मी 'Mc Laren GT ' ला खूप कमी वेळा चालवलं आहे. ती कार बरेच दिवस गॅरेजमध्ये असल्याने त्यामधील मॅटचा उंदरांनी कुरतडून भुगा केला. त्याचा मला चांगलाच फटका बसला. मला कारच्या मॅटसाठी लाखो रुपये खर्च करावे लागले". असा खुलासा त्याने केला.

मीडिया रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये कार्तिकचा 'भूल भूलैया -२ ' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील कार्तिकचं काम पाहून दिग्दर्शक भूषण कुमार यांनी त्याला एक कार गिफ्ट केली. या कारची किंमत जवळपास १.७२ कोटी इतकी आहे. पण सध्या ही कार गॅरेजमध्ये असल्याची माहिती त्याने दिली. 

लवकरच कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. कार्तिकने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ट्रेलरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ज्यामुळे नेटकऱ्यांनी कार्तिकचं तोंडभरून कौतुक देखील केलं. 

Web Title: bollywood actor kartik aaryan revealed in interview rats bite her mc laren gt car mat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.