बॉलिवूड पडद्यावरील खलनायक अभिनेता महेश आनंद यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:23 IST2019-02-09T19:23:26+5:302019-02-09T19:23:39+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत १९८० ते १९९० सालापर्यंत खलनायकाच्या भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडणारे अभिनेता महेश आनंदचे यारी रोड येथील राहत्या घरी निधन झाले

बॉलिवूड पडद्यावरील खलनायक अभिनेता महेश आनंद यांचं निधन
हिंदी चित्रपटसृष्टीत १९८० ते १९९० सालापर्यंत खलनायकाच्या भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडणारे अभिनेता महेश आनंद यांचे यारी रोड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार त्यांचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले आहे. नुकतेच त्यांनी गोविंदाचा सिनेमा रंगीला राजामधून सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन केले होते.
महेश आनंद यांनी शहेनशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले होते. नुकताचा गोविंदाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट रंगीला राजामध्ये त्यांनी काम केले होते. जवळपास १८ वर्षानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक केले होते. या चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी आहेत आणि महेश आनंद यांनी पहलाज निहलानी यांच्यासोबत अंदाज व आग का गोलामध्ये एकत्र काम केले होते.