बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:34 IST2025-02-21T10:34:15+5:302025-02-21T10:34:41+5:30

भर थंडीत आणि बर्फात अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

bollywood actor milind soman doing push ups in snow shared video | बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात"

बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात"

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देताना दिसतात. सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात. यासाठी डाएटसोबतच ते नियमित व्यायामही करतात. अनेक सेलिब्रिटींची जीम व्हिडिओही व्हायरल होत असतात. तर काही कलाकार व्यायाम किंवा योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना त्याचं महत्त्व पटवून देत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

या व्हिडिओमध्ये अभिनेता बर्फात पुशअप्स करताना दिसत आहे. भर थंडीत आणि बर्फात अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. व्हिडिओ दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून मिलिंद सोमण आहेत. मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या मिलिंद सोमण हे नॉर्वेमधील ट्रॉस्मो येथे आहेत. तिथे सकाळी लवकर उठून त्यांनी पुशअप्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 


मिलिंद सोमण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ५९ वर्षांच्या मिलिंद सोमण यांचा फिटनेस कमालीचा आहे. त्यांचा फिटनेस फंडा ते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मिलिंद सोमण त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिले आहेत. पहिलं लग्न मोडल्यानंतर २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Web Title: bollywood actor milind soman doing push ups in snow shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.