श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते मिथुन चक्रवर्ती; अभिनेत्याच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:22 PM2023-09-07T17:22:04+5:302023-09-07T17:23:25+5:30
Mithun Chakraborty: 'जाग उठा इंसान' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या सेटवर या दोन्ही कलाकारांची जवळीकता वाढली होती.
उत्तम अभिनयशैली आणि उत्तम डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. कायम सिनेमांमुळे चर्चेत येणारा मिथुन बऱ्याचदा त्याच्या लव्हलाइफमुळेही चर्चेत आला आहे. यात खासकरुन त्याचं आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं अफेअर चांगलंच गाजलं होतं. इतकंच नाही तर मिथुनच्या पत्नीला त्यांच्या अफेअरची कुणकुण लागल्यानंतर तिने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
'जाग उठा इंसान' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या सेटवर या दोन्ही कलाकारांची जवळीकता वाढली होती. एकीकडे सिनेमाची चर्चा होत असतानाच दुसरीकडे मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु, या दोघांनी कधीही जाहीरपणे हे नातं मान्य केलं नाही. विशेष म्हणजे त्यावेळी मिथुनचं लग्न झालं होतं. त्याने अभिनेत्री योगिता बाली हिच्यासोबत लग्न केलं होतं.
मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या चर्चांनी त्या काळी इतका जोर धरला की योगिता बालीने आत्महत्या करायचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच अचानकपणे मिथुन आणि श्रीदेवी यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चा कानावर पडतात योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला. घडलेला हा प्रकार पाहून मिथुनने श्रीदेवीसोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले असं म्हटलं जातं. दरम्यान, मिथुन आणि श्रीदेवी यांचं अफेअर जवळपास ३ वर्ष सुरु होतं. परंतु, मिथुन योगिताला घटस्फोट देणार नाही या विचाराने श्रीदेवीने मिथुनपासून फारकत घेतली त्यानंतर १९८८ मध्ये ही जोडी विभक्त झाली असंही म्हटलं जातं.