"कधीच किसिंग सीन केले नव्हते, पण तिने...", विद्या बालनबद्दल प्रतीक गांधी नेमकं काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:04 IST2025-02-01T10:00:33+5:302025-02-01T10:04:52+5:30
प्रतीक गांधीने सांगितला विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणतो...

"कधीच किसिंग सीन केले नव्हते, पण तिने...", विद्या बालनबद्दल प्रतीक गांधी नेमकं काय म्हणाला?
Pratik Gandhi: नव्या वर्षात प्रदर्शित होणारे नवे चित्रपट हे जणू प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहेत. अलिकडेच अॅक्शन,थ्रिलर आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली. प्रतीक गांधी आणि यामी गौतमचा 'धूम धाम' हा सिनेमा त्यातीलच एक आहे. सध्या प्रतीक आणि यामीची त्यांचा आगामी सिनेमा धूमधाममुळे चर्चा आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. त्यादरम्यान अभिनेत्याने विद्या बालनसोबत (Vidya Balan) 'दो और दो प्यार'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. त्याचबरोबर प्रतीकने चित्रपटातील किसिंग सीनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच प्रतीक गांधीने 'लेहरेन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने 'दो और दो प्यार'मध्ये त्याने केलेल्या पहिल्या किसींग सीनवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर हे सीन शूट करताना विद्याने त्याला कम्फर्टेबल होण्यास कशी मदत केली, त्याबद्दल त्याने सांगितलं. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "मी सीन शूट करण्यापूर्वी विचारलं होतं की, कोणत्याही गोष्टीला दाखवण्याचे अनेक पर्याय असतात. तुम्ही मला सांगा आणि मग मी तुम्हाला काही पर्याय सांगतो. परंतु नक्की काय करायचं आणि स्क्रीनवर काय दाखवायचं हे तिचं ठरलं होतं. पण, मी यापूर्वी कधीच किसिंग सीन केले नव्हते. परंतु तिने हे सगळं ज्या पद्धतीने हाताळलं ते उत्तम होतं. एक दिग्गज कलाकार म्हणून सीन्स चांगले करणं किंवा बिघडवणं हे तिच्या हातात होतं."
पुढे प्रतीक गांधी विद्या बालनचं कौतुक करत म्हणाला, "ती माणूस म्हणून फार चांगली व्यक्ती आहे. याशिवाय चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरचं वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी ती प्रयत्न करत असे. याच कारणामुळे आम्ही तो सीन हसत-हसत शूट केला."
'धूम धाम' या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषी सेठ यांनी केलं आहे.'धूम धाम' या चित्रपटामध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे, हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'OTT 'प्लॅटफॉर्म 'Netflix' वर प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.