R. madhavan आवडतो 'हा' कोल्हापुरी पदार्थ; कोल्हापूरसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:11 AM2023-06-01T09:11:33+5:302023-06-01T09:12:32+5:30
R. madhavan: आर. माधवन अर्थात रंगनाथन महादेवचं कोल्हापूरसोबत खास नातं असून तो एका कोल्हापूरी पदार्थाच्या अक्षरश: प्रेमात आहे.
रहना हैं तेरे दिल में असं म्हणत उभ्या तरुणाईला वेड लावणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन(R. madhavan) . हा सिनेमा रिलीज होऊन आज बरीच वर्ष झाली मात्र, माधवनची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्रासोबत आणि खासकरुन कोल्हापूरसोबत खास नातं आहे. आर. माधवन अर्थात रंगनाथन महादेवचं कोल्हापूरसोबत खास नातं असून तो एका कोल्हापूरी पदार्थाच्या अक्षरश: प्रेमात आहे. एका मुलाखतीत त्याने त्याचं कोल्हापूर कनेक्शन कसं आहे हे सांगितलं.
रंगनाथन माधवन अर्थात आर. माधवन या अभिनेत्याचे आणि कोल्हापूरचे एक वेगळंच नातं आहे. दाक्षिणेतील हिरो म्हणून जरी त्याची ओळख असली तरी, महाराष्ट्राशी म्हणजे आपल्या जगात भारी कोल्हापूरशी त्याचे अतूट नाते आहे. अनेकदा माधवन त्याच्या कोल्हापूर प्रेमाबद्दल बोलत असतो.
माधवनने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे बरीच वर्ष त्याने कोल्हापूरमध्ये घालवली. विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये असताना त्याला त्याचं प्रेम मिळालं.
असा झाला कोल्हापूरचा जावई
राजाराम महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कोल्हापूरमध्येच व्यक्तिमत्व विकास आणि वकृत्व कौशल याचे वर्ग सुरु केले होते. त्याच्या या क्लासमध्ये सरिता बेर्जे विद्यार्थिनी म्हणून येत होती. परंतु, या क्लास दरम्यान दोघांचं सूत जमलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १९९९ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली.
माधवनला आवडतो हा कोल्हापुरी पदार्थ
कॉलेजमध्ये शिकत असताना माधवन राजारामपुरी येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होता. याच ठिकाणी त्याने एक जेवणाची मेस लावली होती. या मेसमुळे त्याला अनेक कोल्हापुरी पदार्थांची चव चाखता आली. त्यामुळे माधवनदेखील या पदार्थांच्या प्रेमात पडला. माधवनला कोल्हापुरी मिसळ प्रचंड आवडते. याविषयी त्याने एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं.
"मुंबईचे खाद्यपदार्थ म्हणजे मराठी खाद्यपदार्थ. यात कोल्हापुरी मिसळ आणि त्यात मिळणारा कट जगात कुठेही दुसरीकडे तयार करता येणार नाही. हा कट मुंबई, पुण्यातही मिळत नाही. त्यामुळे कोल्हापुरचा कट आहे तो कटच वेगळा. तो खाल्ल्यानंतर तोंडाला ज्या झिणझिण्या येतात त्या फार कमाल असतात. त्यामुळे कायम खास मिसळ खाण्यासाठी मी कोल्हापुरला जातो," असं माधवन म्हणाला होता.