राजकुमार राव-वामिका गब्बी यांच्या 'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:30 IST2025-03-26T14:28:04+5:302025-03-26T14:30:23+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीत आऊटसाइडर असूनही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव.

राजकुमार राव-वामिका गब्बी यांच्या 'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 'हे' आहे कारण
Bhool Chuk Maaf Movie:बॉलिवूड इंडस्ट्रीत आऊटसाइडर असूनही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव (Rajkumar Rao). 'स्त्री-२' चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता प्रसिद्धीझोतात आला. आता लवकरच राजकुमार राव एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भूल चूक माफ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. परंतु नुकतीच या चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या १० एप्रिलच्या दिवशी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. सोशल मीडियावर 'मॅडॉक फिल्म्स'ने याबाबत पोस्ट शेअर करत सिनेरसिकांना माहिती दिली आहे.
करण शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचं कथानक दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. दरम्यान सोशल मीडियावर 'मॅडॉक फिल्म्स'ने एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. "अपनी हल्दी में ही अटक गए रंजन और तितली. क्या उनकी शादी का दिन आएगा कभी? पता चलेगा ९ मई को. भूल चूक माफ सभी सिनेमाघरों में...", असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. आता हा चित्रपट १० एप्रिलला नाही तर ९ मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे. १० एप्रिलला सनी देओल स्टारर 'जाट' सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट रिलीज डेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' या चित्रपटाचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. शिवाय दिनेश विजन यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत.