दिवाळीलाच राजपाल यादवला का मागावी लागली हात जोडून माफी? व्हिडीओ व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:13 PM2024-11-01T17:13:44+5:302024-11-01T17:14:21+5:30

दिवाळीच्या दिवसांमध्ये राजपाल यादवला चाहत्यांची माफी का मागावी लागली? (rajpal yadav)

bollywood actor Rajpal Yadav have to apologize on Diwali for his video of crackers banned in diwali | दिवाळीलाच राजपाल यादवला का मागावी लागली हात जोडून माफी? व्हिडीओ व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

दिवाळीलाच राजपाल यादवला का मागावी लागली हात जोडून माफी? व्हिडीओ व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादव हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता.  राजपालने त्याच्या करिअरमध्ये आजवर अनेक कॉमेडी भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. राजपाल यादवच्या सिनेमांंचं स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे. राजपाल यादव तसा कोणत्याही वादात सापडत नाही.  पण नुकतंच राजपालने स्वतःबद्दल नवा वाद ओढवून घेतलाय. यामध्ये ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये राजपालला लोकांची माफी मागावी लागली आहे. काय घडलं नेमकं?

राजपाल यादवने का मागितली माफी?

राजपालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात म्हणाला आहे की, "नमस्कार मित्रांनो. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दोन दिवसांपूर्वी मी दिवाळीसंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. परंतु तो व्हिडीओ लगेच मी डिलीट केला. त्या व्हिडीओमुळे देश-विदेशातील लोकांच्या भावना मी दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागतो. तुम्ही सर्व दिवाळी आनंदात साजरी करा. स्वस्थ राहा-मस्त राहा. जय हिंद - जय भारत"


राजपाल यादवला का मागावी लागली माफी?

झालं असं की, राजपाल यादवने काही दिवसांपूर्वी दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर करु नका, त्यामुळे जनावरांना त्रास होतो, अशा पद्धतीचा व्हिडीओ बनवला होता. परंतु हा व्हिडीओ लोकांना मात्र पसंत पडला नाही. नेटकऱ्यांनी राजपालचे जुने व्हिडीओ शोधून काढले त्यात तो चिकन ब्रँडचं प्रमोशन करताना दिसला. त्यामुळे लोकांनी राजपालच्या बोलण्यातला विरोधाभास दर्शवून चांगलीच नाराजी प्रकट केली. यामुळे राजपालने जुना व्हिडीओ डीलीट करुन लोकांची माफी मागितली. राजपालची भूमिका असलेला 'भूल भूलैय्या ३' सिनेमा नुकताच रिलीज झालाय.

 

Web Title: bollywood actor Rajpal Yadav have to apologize on Diwali for his video of crackers banned in diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.