राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:53 IST2025-01-09T10:48:44+5:302025-01-09T10:53:59+5:30
अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला.

राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..."
Rajpal Yadav On Baby john Movie: अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अॅटली कुमार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात वरुण धवनसह साउथ क्वीन अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत होती. याशिवाय वामिका गब्बी राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट देखील 'बेबी जॉन'मध्ये पाहायला मिळाली. अॅक्शन,ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना काही आकर्षित करू शकलेला नाही. दरम्यान, अभिनेता राजपाल यादवने एका मुलाखतीमध्ये वरुण धवनच्या बाबतीत खुलासा केला आहे.
नुकतीच राजपाल यादवने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला एक प्रश्न विचारण्यात आला. 'बेबी जॉन' फ्लॉप झाल्यामुळे वरुण धवन डिप्रेशनमध्ये गेला आहे? का असा तो प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितलं, "वरुण खूप चांगला मुलगा आहे आणि तो प्रचंड मेहनती देखील आहे. तो नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. याबाबतीत त्याचं कौतुक झालंच पाहिजे. कारण कोणतंही आव्हान स्विकारणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे."
पुढे राजपाल यादव म्हणाला, "बेबी जॉन' चित्रपट हा थलपती विजयच्या 'थेरी' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक नसता तर हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असता. परंतु थलापती विजय यांचा 'थेरी' अनेकांनी पाहिला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली."
अभिनेता राजपाल यादवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच तो भूल भुलैय्या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली.