कधी टॅक्सी ड्रायव्हर तर कधी वेटर म्हणून केलं काम, पण बॉलिवूडमुळे नशीबच बदललं; आज आहे कोट्यवधींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:57 IST2024-05-07T13:55:33+5:302024-05-07T13:57:37+5:30
अभिनयासारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं म्हणजे फार मोठी गोष्ट समजली जाते.

कधी टॅक्सी ड्रायव्हर तर कधी वेटर म्हणून केलं काम, पण बॉलिवूडमुळे नशीबच बदललं; आज आहे कोट्यवधींचा मालक
Randeep Hooda Inspirational Story : अभिनयासारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं म्हणजे फार मोठी गोष्ट समजली जाते. पण हिंदी कलाविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी प्रचंड संघर्ष करावा लागला. अशाच एक अभिनेत्याच्या संघर्षमय जीवनाची अज्ञात बाजू आपण जाणून घेणार आहोत. मोठा संघर्ष केल्यानंतर त्याने बॉलिवूडच्या टॉप स्टार्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
हा अभिनेता म्हणजेच बॉलिवूडचा हॅंडसम हंक स्टार रणदीप हुड्डा आहे. अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्याने चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अलिकडेच रणदीप हुड्डा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'साहीब बीबी', 'गॅंगस्टार', 'सरबजीत' तसेच 'हायवे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता.
हरियाणामधील मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्टमध्ये रणदीपने त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने ऑस्ट्रेलियाची वाट धरली. त्याचदरम्यान अभिनेता मेलबर्नमध्ये शिकत असताना त्याने खूप संघर्ष केला होता. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरपासून वेटरपर्यंत अनेक कामं त्याला करावी लागली आहेत. ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर रणदीप भारतात परतला आणि त्याने एका एअरलायंस मार्केटिंग कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली.
पण नियतीच्या मनातही काही वेगळंच होतं. अभिनेत्याने ती नोकरी सोडून मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर अभिनेत्याचं नशीब चांगलंच फळफळलं. मॉडेलिंगनंतर रणदीपला एकापेक्षा एक हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याच्या ऑफर येऊ लागल्या. फायनान्शिल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सध्याच्या घडीला अभिनेता रणदीप हुड्डा ८० कोटींचा मालक आहे.