तब्बल ८ किलो वजन वाढवलं अन्...; 'जाट' सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाची तगडी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:29 IST2025-03-19T12:28:25+5:302025-03-19T12:29:41+5:30

बॉलिवूड अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या 'जाट या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

bollywood actor randeep hooda massive transfromation for upcoming movie jaat starrer sunny deol  | तब्बल ८ किलो वजन वाढवलं अन्...; 'जाट' सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाची तगडी मेहनत

तब्बल ८ किलो वजन वाढवलं अन्...; 'जाट' सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाची तगडी मेहनत

Randeep Hooda:बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेल्या 'जाट या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा ॲक्शन पॅक्ड सिनेमा येत्या १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चित चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. शिवाय लक्षवेधी गोष्ट म्हणजे यामध्ये रणदीप आणि सनी देओलमध्ये कॉंटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाप्रमाणे अभिनेता रणदीप हुड्डा देखील सातत्याने चर्चेत आहे. 

दरम्यान,अलिकडेच 'जाट' मधील रणदीप हुड्डाचा खलनायिकी लूकमधील पोस्टर रिलीज करण्यात आलं. त्यामुळे सिनेरसिकांना चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु सिनेमातील 'रणतुंगा'च्या लूकसाठी अभिनेत्याने भरपूर कष्ट आणि मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी रणदीपने चक्क ८ किलो वजन वाढवलं असून आपल्या आवाजावर सुद्धा काम केल्याचं सांगण्यात येत आहे. रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्य वीर सावकर' या चित्रपटानंतर लगेचच 'जाट' या त्याच्या आगामी प्रोडजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली. 'स्वातंत्र्य वीर सावकर' मध्ये अभिनेत्याने त्याचं वजन कमी केलं होतं. 

त्यानंतर आता 'जाट' चित्रपटात आपला रॉ-लूक दिसण्यासाठी अभिनेत्याने चांगला प्रयत्न केला आहे. 'रणतुंगा'च्या भूमिकेसाठी परफेक्ट दिसण्यासाठी त्याने कोणताही कसर सोडलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट आता प्रेक्षकांना किती भावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 'जाट' सिनेमात सनी देओलसह रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष यांसारख्या तगड्या कलाकारांची फली पाहायला मिळणाकर आहे. गोपीचंद मालिनेनी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: bollywood actor randeep hooda massive transfromation for upcoming movie jaat starrer sunny deol 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.