"मुलीची जात वेगळी होती म्हणून आई-बाबांनी लग्नाला विरोध केला"; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:01 IST2025-04-16T12:01:06+5:302025-04-16T12:01:35+5:30

होणाऱ्या बायकोची जात वेगळी असल्याने बॉलिवूड अभिनेत्याच्या घरच्यांनी केला लग्नाला विरोध

bollywood-actor-randeep-hooda-parents-opposed-marriage-due-to-caste-difference | "मुलीची जात वेगळी होती म्हणून आई-बाबांनी लग्नाला विरोध केला"; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला अनुभव

"मुलीची जात वेगळी होती म्हणून आई-बाबांनी लग्नाला विरोध केला"; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला अनुभव

रणदीप हुड्डा (randeep hooda) हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता. रणदीपने आजवर विविध सिनेमांमध्ये भूमिका करुन त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. रणदीपने त्याच्या आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. इतकंच नव्हे अनेक प्रभावी भूमिकाही साकारल्या. काहीच दिवसांपूर्वी रणदीपने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्न केलं. पण रणदीपच्या लग्नाला त्याच्या घरच्यांचा विरोध होता. मणिपूर भागात राहणाऱ्या लिनसोबत लग्न करण्यास रणदीपच्या आई-बाबांनीच विरोध केला होता. काय होतं यामागचं कारण.

रणदीप हुड्डाच्या लग्नाला विरोध कारण...

शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत रणदीपने त्याच्या लग्नाच्या वेळी काय घडलेलं ते सांगितलं. तो म्हणाला की, "माझ्या लग्नाच्या वेळेस अनेक समस्यांना मला तोंड द्यावं लागलं. जे इतरांच्या कुटुंबात घडतं तसंच माझ्याही आई-बाबांना वाटत होतं की, मी आमच्याच जातीच्या मुलीसोबत लग्न करेन. जाट कुटुंबात या गोष्टी सर्रास घडत असतात. मी एकमेव असा व्यक्ती ज्याने जाट नसलेल्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे सर्वांना या गोष्टीचा त्रास होता. पण हळूहळू ही समस्या दूर झाली."

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, रणदीपची खलनायकी भूमिका असलेला 'जाट' सिनेमा रिलीज झाला आहे. सनी देओलसमोर रणदीपने तगडी खलनायकी भूमिका साकारली आहे. रणदीप हुड्डाची भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २०२४ ला रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. याशिवाय रणवीरने साकारलेल्या वीर सावरकरांच्या भूमिकेचंही कौतुक झालं. 

 

Web Title: bollywood-actor-randeep-hooda-parents-opposed-marriage-due-to-caste-difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.