'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:16 IST2025-02-13T16:10:23+5:302025-02-13T16:16:10+5:30
रोहित शेट्टीने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट
Rohit Shetty New Project: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांची मुख्य भूमिका असलेला 'सिम्बा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं. या चित्रपटात रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसला. एकंदरीत चित्रपटाचं कथानक त्यातील गाणी संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. अशातच 'सिम्बा'च्या यशानंतर रणवीर सिंग आणि सारा अली खान ही जोडी रुपेरी पुन्हा पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोहित शेट्टीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.
रोहित शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल घोषणा केली आहे. रोहित शेट्टी लवकरच रोमकॉम चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान हे मुख्य भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. "ड्रामा, अॅक्शन आणि रोमान्स सब मिलेगा एक ही कहाणी मैं २०२५ का बिगेस्ट ब्लॉकबस्टर कमिंग सुन..." असं कॅप्शन त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला दिलंय. त्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये सारा अली खानचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतोय.
'सिम्बा'मध्ये आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने मने जिंकणारी ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, रोहित शेट्टीने त्याच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही. रोहित शेट्टीच्या म्हणण्यानूसार हा २०२५ मधील सगळ्या मोठी रोमॅन्टिक सिनेमा असणार आहे. परंतु अद्यापही या सिनेमाचं नाव रिव्हिल करण्यात आलेलं नाही.