Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:42 AM2022-07-24T11:42:17+5:302022-07-24T11:42:39+5:30

Ranveer Singh Photoshoot Poonam Pandey Reaction: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

bollywood actor ranveer singh poonam pandey reacted on bold nude photoshoot twitter shares photos | Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

googlenewsNext

Ranveer Singh Photoshoot Poonam Pandey Reaction: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. रणवीर सिंगने नुकतेच एक न्यूड फोटोशूट केले आहे. रणवीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरच्या फोटोशूटवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेक सेलेब्स त्याचे कौतुकही करत आहेत. काहींनी त्याच्या फोटोशूटवर टीका केलीये तर काहींनी त्याच्या फोटोंचं कौतुक केले आहेत. रणवीरच्या फोटोशूटवर पूनम पांडेची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्याच गेममध्ये रणवीरनं हरवलं असल्याची प्रतिक्रिया पूनम पांडेने दिली.

पूनम पांडेने रणवीर सिंगच्या फोटोशूट शेअर करत त्यावर कमेंट केले आहे. तू मलाच माझ्या गेममध्ये हरवलं आहे, असं ट्वीट तिनं केलं आहे. पूनम पांडेचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. पूनमच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केली आहेत. रणवीरने पेपर मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यावर मीम्सही तयारकेलेल आहे.


रणवीरच्या या फोटोशूटवर त्याची पत्नी दीपिका पदुकोणची प्रतिक्रियाही समोर आली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार त्याचं हे फोटोशूट दीपिकाच्या पसंतीस उतरले आहे. तिला हे कॉन्सेप्टही आवडले आहे. इंटरनेटवर शेअर होण्यापूर्वीच दिपिकानं त्याचं हे फोटोशूट पाहिल्याचंही म्हटलं जात आहे.

Web Title: bollywood actor ranveer singh poonam pandey reacted on bold nude photoshoot twitter shares photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.