रणवीर सिंगलाही आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला- "दिग्दर्शकाने मला घरी बोलवलं आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 02:52 PM2024-04-18T14:52:47+5:302024-04-18T14:57:57+5:30
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत या नायकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या संघर्षाच्या काळामध्ये या अभिनेत्याने असंख्य संकटांना तोंड दिलं.
Ranveer Singh : हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाच्या चंदेरी दुनियेत आपली ओळख निर्माण करणं हे सोपं काम नाही. सिनेजगतातील बऱ्याच कलाकारांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत नाव कमावलं. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा सिनेजगतातील प्रवास हा प्रेरणादायी आहे. 'यश राज फिल्म' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत या अभिनेत्याने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका निभावल्या आहेत. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता रणवीर सिंग आहे.
मीडिया रिपोर्टनूसार, हिंदी मनोरंजन विश्वात यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अॅक्टरला प्रचंड संघर्ष करावा लागला. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंगने त्याच्या इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल खुलासा केला, बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
रणवीरला एका दिग्दर्शकाने त्याच्या अंधेरीतील राहत्या घरी येण्याचं आमंत्रण केलं होतं. ''तो खूप वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. माझा पोर्टपोलिओ त्याने कधी पाहिलाच नाही. मी काही ठिकाणी असिस्टंट डायरेक्टरचं कामही केलं होतं. त्यामुळे मला माहित होतं की फक्त ५०० पानांचा पोर्टफोलियो कोणीही पाहणार नाही. माझा पोर्टफोलिओ खुप चांगला होता आणि तो पाहण्यासाठी फार कमी लोकांनी रुची दाखवली", असं रणवीरने सांगितलं.
''मला इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी स्मार्ट आणि सेक्सी दिसावं लागेल, असं दिग्दर्शकाने सांगितलं. तसंच त्यांनी मला 'टेक अँड टच' साठी तयार होण्याचा सल्लादेखील दिला होता," असा खळबळ जनक खुलासाही रणवीरने केला.