"आप हमको बाहर ढूंढ रहें हो और हम...", सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 18:10 IST2025-03-23T17:50:44+5:302025-03-23T18:10:41+5:30

अ‍ॅक्शनचा धमाका अन् जबरदस्त डायलॉग; सलमानच्या बहुचर्चित 'सिकंदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज

bollywood actor salman khan and rashmika mandanna much awaited film sikandar trailer release | "आप हमको बाहर ढूंढ रहें हो और हम...", सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

"आप हमको बाहर ढूंढ रहें हो और हम...", सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Sikandar Trailer :बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर आज (२३ मार्च २०२५) रोजी अखेर प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी 'सिकंदर' चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून सलमान खानच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सलमान आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सलमान संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, ए. आर. मुरुगोदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तर साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे.  ईदचं औचित्य साधून ३० मार्चला भाईजानचा यंदाच्या वर्षातला पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


नुकताच 'सिकंदर' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅक्शन सीन्सने परिपूर्ण असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या ट्रेलरमध्ये सलमानने त्याचे अ‍ॅक्शन सीन्स, स्टंटबाजीसोबत आपल्या डान्सने देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्याने शेअर केलेला ट्रेलर पाहून त्याचे चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "द रिअल किंग इज बॅक" तर आणखी एका चाहत्याने लिहिलंय, "पॉवर ऑफ सलमान खान..."

दरम्यान, 'सिकंदर' चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पा म्हणजेच अभिनेते सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: bollywood actor salman khan and rashmika mandanna much awaited film sikandar trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.