आजही सोशल मीडियावर 'या' दोन एक्स गर्लफ्रेंडला सलमान करतो फॉलो; नाव पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:02 PM2022-07-06T19:02:13+5:302022-07-06T19:03:11+5:30
Salman khan: विशेष म्हणजे एकाही गर्लफ्रेंडसोबत लग्न न करणारा सलमान त्याच्या दोन एक्स गर्लफ्रेंडला अजूनही फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे.
भाईजान, सलमान भाई, दबंग खान अशा कितीतरी नावांनी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान (salman khan). आजवर सलमान विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. यात त्याच्या फिल्मी करिअरपेक्षा पर्सनल लाइफ आणि अफेअर्स सर्वाधिक वेळा चर्चिले गेले. सलमानचं नाव बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. यात ऐश्वर्या रायसह कतरिना कैफपर्यंत अनेक जणींसोबत त्याचं अफेअर गाजलं. परंतु, अद्यापही सलमान सिंगल आहे. विशेष म्हणजे एकाही गर्लफ्रेंडसोबत लग्न न करणारा सलमान त्याच्या दोन एक्स गर्लफ्रेंडला अजूनही फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सलमानचा चांगलाच वावर आहे. त्यामुळे आज ट्विटर, इन्स्टाग्रामवर त्याचे असंख्य फॉलोअर्स असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सलमान अगदी मोजक्या व्यक्तींना फॉलो करतो यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचाही समावेश आहे.
या २ एक्स गर्लफ्रेंडला सलमान करतो फॉलो
सलमान खान इन्स्टाग्रामवर केवळ 35 जणांना फॉलो करतो. यात त्याच्या दोन एक्स गर्लफ्रेंडचाही समावेश आहे. संगिता बिजलानी आणि कतरिना कैफ या दोघींना फॉलो करतो.
दरम्यान, सलमान आणि संगिता बिजलानी यांचं प्रेमप्रकरण एकेकाळी प्रचंड गाजलं होतं. मात्र, काही कारणास्तव हे दोघं विभक्त झाले. त्याचप्रमाणे कतरिनासोबतही सलमानचं नाव जोडलं गेलं होतं. सलमानला कतरिना आवडत असल्याचं म्हटलं जायचं. मात्र, याविषयी कतरिनाने कोणतंही भाष्य केलं नाही. कतरिनाने काही काळापूर्वीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आहे.