बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या आईलाही झाला कोरोना, बहिणीसोबत स्वत:ला केले होम क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:32 AM2020-05-17T10:32:12+5:302020-05-17T10:32:21+5:30

त्याने पोस्टमध्ये लिहिले, ‘काही दिवसांपूर्वी आईची तब्येत बिघडली होती. शंका आल्याने आम्ही तिची कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटीव्ह आली. 

bollywood actor satyajeet dubey mother tests covid 19 positive-ram | बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या आईलाही झाला कोरोना, बहिणीसोबत स्वत:ला केले होम क्वारंटाईन

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या आईलाही झाला कोरोना, बहिणीसोबत स्वत:ला केले होम क्वारंटाईन

googlenewsNext
ठळक मुद्देसत्यजीत दुबेने त्याच्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘ऑलवेज कभी कभी’ या सिनेमातून केली.

‘प्रस्थानम’ या चित्रपटात झळकलेला बॉलिवूड अभिनेता सत्यजीत दुबे याच्या कुटुंबालाही कोरोना संकटाचा सामना करावा लागतोय. होय, सत्यजीतच्या आईला कोरोना झाला आहे. यानंतर सत्यजीत व त्याच्या बहीणीला होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
सत्यजीतने स्वत: इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. त्याने पोस्टमध्ये लिहिले, ‘काही दिवसांपूर्वी आईची तब्येत बिघडली होती. तिला माइग्रेनचा अटॅक आला. यानंतर ताप, उलटी सुरु झाली. शंका आल्याने आम्ही तिची कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटीव्ह आली. तिला नानावटी रूग्णालयातील एका वार्डात आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. ती लवकर बरी होईल, असा मला विश्वास आहे. तूर्तास तरी माझ्यात आणि माझ्या बहिणीत कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. मात्र गेले काही दिवस मी, माझी आई, माझी बहिण आम्ही सगळे थोड्या अडचणींमधून जात आहोत. थोडा हा शब्द यासाठी की, सामान्य लोक, कोरोना वॉरिसर्य आमच्यापेक्षाही खराब स्थितीत आहेत. 

मी माझे सर्व मित्र, शेजारी, पालिका अधिकारी, कोरोना वॉरियर्स या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांचे खूप सहकार्य व प्रेम मिळाले. मला पोलिस ठाण्यातून रंजन कुमार यांचा फोन आला. तुम्ही चिंता करू नका. कुठलाही त्रास झाल्यास मला फोन करा. माझा नंबर सेव करा. तुम्हाला दैनंदिन गरजेच्या वस्तूंची निकड असेल तर आम्हाला सांगा. आम्ही पुरवू. असे ते मला म्हणाले. त्यांचे हे सांत्वनाचे व धीराचे शब्द खूप मदतगार ठरलेत.’

सत्यजीत दुबेने त्याच्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘ऑलवेज कभी कभी’ या सिनेमातून केली. यानंतर लक लक की आत, बांके की क्रेजी बारात अशा चित्रपटांत तो दिसला. त्याआधी झांसी की रानी, महाराज की जय हो अशा मालिकांमध्येही तो झळकला.

सत्यजीत  केवळ बारा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले, अशास्थितीत त्याच्या  आजीने त्याला लहानाचे मोठे केले. छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावात सत्यजीतचे शिक्षण झाले आहे. इंडस्ट्रीतील कोणालाच ओळखत नसताना केवळ अभिनयाची आवड असल्याने 2007 मध्ये  सत्यजीत मुंबईत आला. त्यावेळी तो केवळ 16 वर्षांचा होतो़ यानंतर अतिशय कष्टाने तो इथवर पोहोचला. 

Web Title: bollywood actor satyajeet dubey mother tests covid 19 positive-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.