खिशात पैसे नव्हते, प्रेमासाठी कॅमेरा विकला, गौरीसाठी शाहरुखला द्यावी लागली होती 'अग्निपरिक्षा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 16:37 IST2024-05-06T16:35:11+5:302024-05-06T16:37:42+5:30
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. अलिकडे अभिनेता त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेचा मुद्दा बनला आहे.

खिशात पैसे नव्हते, प्रेमासाठी कॅमेरा विकला, गौरीसाठी शाहरुखला द्यावी लागली होती 'अग्निपरिक्षा'
ShahRukh Khan Love Story :शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहे. सिनेइंडस्ट्रीतील परफेक्ट जोडी म्हणायची झाली तर या दोघांचं नाव समोर येतं. जवळपास ३२ वर्षांच्या सुखी संसारानंतरही या दोघांमधील प्रेम अजूनही टिकून आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा आपल्या प्रेमासाठी शाहरुखला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. प्रेमसाठी त्याने मुंबई शहर गाठलं होतं. अज्ञात शहरात त्याला रस्तोरस्ती हिंडावं लागलं होतं.
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने त्याच्या प्रेमकथेचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री प्रिती जिंटादेखील संवाद साधताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये किंग खान म्हणतो, कॉलेजच्या दिवसांमध्ये मी दिल्लीमध्ये राहत होता. आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्येच हे दोघं एकमेकांना डेट करु लागलो, असं शाहरुख खान सांगतो. त्यानंतर काही कारणास्तव गौरी मला न सांगताच दिल्ली सोडून मुंबईला गेली. त्यामुळे मी एकटा पडलो. गौरी मुंबईत कुठे राहते याची मला काही कल्पना नव्हती. तिला शोधत शोधत मी मुंबईत पोहचलो.
गौरीसाठी शाहरुखने मुंबई गाठली. त्यादरम्यान अभिनेत्याच्या खिशात थोडेच पैसे होते आणि एक कॅमेरा होता. काही दिवसानंतर ते पैसेही संपले. पैसे नसल्याने मला अखेर मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये माझा कॅमेरा विकावा लागला होता. असं शाहरुख प्रीतीला सांगतो.
पुढे शाहरुख म्हणतो, मला माहित होतं गौरीला बीच प्रचंड आवडतो. माझ्यासाठी तर सिनेमामध्ये दिसणारा बीच होता. एका पंजाबी ड्रायव्हरला मी बीच संदर्भात विचारलं. मी त्याला माझ्याकडील काही पैसे दिले आणि सांगितलं, या पैशांचा हिशोबानूसार जेवढा मीटर चालेल त्या बीचवर आम्हाला घेऊन जा. वेगवेगळ्या बीचेस नावं घेत त्याने आम्हाला मढला सोडलं. अखेर मढ आयलॅंडवर शेवटच्या दिवशी आमची भेट झाली. त्यानंतर गौरीने मला तिच्यासोबत घेऊन जात होती. मी तिला म्हणालो की तिला शोधण्याच्या नादात माझ्याकडचे सगळे पैसे संपले.
त्यानंतर माझ्या आईच्या निधनानंतर मी एकटा पडलो होतो. गौरीला ही गोष्ट समजताच ती मला भेटायला आली. आणि त्यानंतर तिने मला लग्नासाठी प्रपोज केलं.