डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:19 IST2025-01-01T18:17:09+5:302025-01-01T18:19:35+5:30
अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे.

डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर
Shahid Kapoor : 'इश्क विश्क' या चित्रपटातून २००३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor) आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. दरम्यान, अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाहिद कपूर, पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ॲक्शन सीन्सने परिपूर्ण असणारा आहे. 'देवा'मध्ये शाहिद कपूर एका कर्तव्यदक्ष, प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर 'देवा' चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. झी स्टूडिओजने सोशल मीडियावर याची नवी पोस्टर इमेज शेअर केली आहे. डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब अशा अंदाजात शाहिद कपूर या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय.
३१ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे.