मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर शाहिद कपूरला वाटायची 'या' गोष्टीची भीती; म्हणाला- "इंडस्ट्रीत एकमेकांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:48 AM2024-12-03T10:48:12+5:302024-12-03T10:52:47+5:30
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता शाहिद कपूरला (Shahid Kapoor) ओळखलं जातं.
Shahid Kapoor:बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता शाहिद कपूरला (Shahid Kapoor) ओळखलं जातं. शाहिद कपूर इंडस्ट्रीत त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत आला. बऱ्याच अभिनेत्रींसोबत त्यांच नाव जोडलं गेलं होतं. पण, अभिनेत्याने २०१५ मध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत असणाऱ्या कपल्सपैंकी ते एक आहेत. आता शाहिद-मीरा त्याच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहेत. त्या दोघांना मीरा आणि जैन अशी दोन गोड मुलंदेखील आहेत. परंतु शाहिदने जेव्हा मीरासोबत लग्न केलं तेव्हा फक्त ती २१ वर्षांची होती. त्यामुळे अभिनेत्याला लग्नानंतर एका गोष्टीची चिंता कायम सतावत होती, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.
शाहिद कपूर दिलेल्या 'मीड-डे' ला एका मुलाखतीत पत्नी मीरा संदर्भात भाष्य केलं होतं. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मला वाटत होतं की मीराला माझा आधार देणं गरजेचं आहे. कारण त्यावेळी ती फक्त २१ वर्षांची होती. सर्वात महत्वाचं म्हणजेच तिचं बालपण दिल्लीत गेलं होतं. त्यामुळे बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेबद्दल तिचा काहीच कल्पना नव्हती. हे क्षेत्रच थोडं वेगळं आहे. इथे एकमेकांना जज केलं जातं."
पुढे अभिनेता म्हणाला, "परंतु मीराने या सगळ्या गोष्टी जमवून घेतल्या. ती सर्वासोबत मनमोकळेपणाने वागू लागली शिवाय पार्ट्यांमध्ये सुद्धा सहजरित्या वावर करू लागली. या गोष्टीचं मला नवलं वाटलं की तिने हे सगळं इतक्या लवकर कसं जमवलं. ती एक स्ट्रॉंग, आत्मविश्वासू आणि हुशार आहे." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या पत्नीचं तोंडभरून कौतुक केलं.