सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:13 IST2024-12-20T16:10:21+5:302024-12-20T16:13:09+5:30

अभिनेता सलमान खान (Salmaan Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला.

bollywood actor sohail khan refused to work in david dhawan maine pyaar kyun kiya film know the reason  | सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत 

सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत 

Sohail Khan: अभिनेता सलमान खान (Salmaan Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. खान बंधूंच्या जोडीला प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिलं. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'मैने प्यार क्यों किया' हा आहे. हा एक रोम-कॉम चित्रपट होता. सलमान खान, सोहेल खान, कतरिना कैफ आणि सुष्मिता सेन यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी चित्रपटात पाहायला मिळाली. सोहले खानने या सिनेमात कतरिना कैफचा शेजारी प्यारे मोहन लालची व्यक्तिरेखा साकारली होती. 'मैने प्यार क्यों किया' मधील अभिनेत्याची विनोदी शैली प्रेक्षकांना पसंतीस उतरली. परंतु ही भूमिका साकारण्यास अभिनेत्याने स्पष्टपणे नकार दिला होता. 

'फिल्म कंपेनियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानने याबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी सलमानने सांगितलं की, "शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सोहेल सेटवरून परत आला होता. चित्रपटातील कॅरेक्टर त्याला आवडलं नव्हतं. त्यामुळे दिग्दर्शक डेविड धवनदेखील नाराज झाले होते."

पुढे अभिनेता म्हणाला, "डेविड धवन यांनी तेव्हा २० दिवसांचं शेड्यूल ठरवलं होतं. शिवाय सोहेलच्या जागी सैफ अली खानला कास्ट करण्याच्या विचारात ते होते. त्यानंतर सोहेलला समजवलं आणि त्याने चित्रपटात काम केलं." अस सलमान खानने सांगितलं.

Web Title: bollywood actor sohail khan refused to work in david dhawan maine pyaar kyun kiya film know the reason 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.