सोनू सूद सारखाच आहे त्याचा चाहता; अभिनेत्याच्या छायाचित्रासाठी वापरलेले 2500 किलो तांदूळ करणार दान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 03:47 PM2023-04-10T15:47:04+5:302023-04-10T15:47:59+5:30

Sonu sood: छायाचित्रासाठी वापरलेले तांदूळ वाया जाऊ नयेत यासाठी ते तांदूळ गरजू लोकांमध्ये दान करण्यात येणार आहेत.

bollywood actor sonu sood amazing portrait from 2500 kg rice | सोनू सूद सारखाच आहे त्याचा चाहता; अभिनेत्याच्या छायाचित्रासाठी वापरलेले 2500 किलो तांदूळ करणार दान

सोनू सूद सारखाच आहे त्याचा चाहता; अभिनेत्याच्या छायाचित्रासाठी वापरलेले 2500 किलो तांदूळ करणार दान

googlenewsNext

करोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद (sonu sood).  सोनूने या काळात केलेल्या मदतकार्यामुळे आज तो अनेकांसाठी ऑफस्क्रीन हिरो ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते आज पाहायला मिळतात. यामध्ये सध्या सोनू सूदच्या एका जबरा फॅनची चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने चक्क 2500 किलो तांदळावर सोनू सूदचं छायाचित्र रेखाटलं आहे.

मध्य प्रदेशमधील एका चाहत्याने 2500 किलो तांदूळ वापरुन सोनू सूदचं छायाचित्र रेखाटलं. सोनू सूदप्रती असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी त्याने हे छायाचित्र रेखाटलं आहे. इतकंच नाही तर हे तांदूळ नंतर दान करण्यात येणार असल्याचंही त्याने सांगितलं.

मध्य प्रदेशातील देवास येथे असलेल्या तुकोजीराव पवार स्टेडिअमवर ९ एप्रिल रोजी एका चाहत्याने १ एकरपेक्षा जास्त जागेत तांदळापासून सोनू सूदचं छायाचित्र रेखाटलं. विशेष म्हणजे हे तांदूळ पुढे वाया जाऊ नयेत यासाठी त्याने ते तांदूळ गरजू लोकांमध्ये दान करणार असल्याचं सांगितलं. याविषयी सोनू सूदला खबर लागताच त्याने या चाहत्याचं कौतुक केलं आहे.

"प्रत्येक दिवस चाहते माझ्याप्रती व्यक्त करत असलेल्या प्रेमासाठी मी खूप आभारी आहे. तुमच्या आवडीचं, लोकांना शक्य होईल त्याप्रकारे मदत करण्याचं काम चाहते पुढे चालू ठेवत आहेत. याचंच कौतुक वाटतं", असं सोनू सूद म्हणाला.

दरम्यान, सोनू लवकरच 'फतेह' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस स्क्रीन शेअर करणार आहे.  त्यामुळे सोनू सूद सध्या त्याच्या आगामी सिनेमामध्ये बिझी आहे.
 

Web Title: bollywood actor sonu sood amazing portrait from 2500 kg rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.