एक-दोन नाही तर तब्बल ३३ सिनेमे रिलीजच झाले नाहीत, असं का घडलं या अभिनेत्याबरोबर, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:53 PM2024-04-01T16:53:26+5:302024-04-01T16:56:32+5:30
सुनील शेट्टीचे हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेच नाहीत. नेमकं काय कारण असेल जाणून घेऊया.
Suniel Shetty : दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता सुनील शेट्टीनेबॉलिवूडवर आपला दबदबा कायम ठेवला. ९० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा हा अभिनेता आजही चाहत्यांच्या मनावर करतोय. उत्कृष्ट स्टंटबाजीच्या जोरावर त्याने चाहत्यांची मनं जिंकली. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून हिंदी मनोरंजन विश्वात सुनील शेट्टीने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. सुनील शेट्टीने १९९२ मध्ये 'बलवान' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या त्याने बॉलिवूडला अनेक शानदार चित्रपट दिले. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोप्पा नव्हता. एक काळ असा होता ज्यावेळी सुनील शेट्टीने चित्रपटांमध्ये काम केलं पण ते चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेच नाहीत.
मीडिया रिपोर्टनूसार, सुनील शेट्टीच्या काही चित्रपटांची घोषणा होऊनही ते मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले नाही. तर काही चित्रपटांचे शूटिंग आर्थिक तंगीमुळे बंद करावं लागलं. माचो मॅन सुनील शेट्टीने त्याच्या अभिनय कारकिर्दीत असेही सिनेमे केले ज्याचं चित्रीकरण केवळ फाइनांस नसल्यामुळे अर्धवटच राहिलं.
सुनील शेट्टीचे 'एक और फौलाद', 'एक और आगे', 'जाहिल', 'हम हैं आग', 'अयुद्ध', 'दी बॉडीगार्ड', 'कौरव','शोला', 'रुस्तम', 'चोरी मोरा काम', 'कर्मवीर','चोर सिपाही', 'कॅप्टन अर्जुन', 'काला पानी', 'कमिश्नर', 'जुआ', 'राधेश्याम सीता राम', 'पुरब की लैल पश्चिम की छैला', 'हम पंछी एक डाल के' , 'एक हिंदुस्तानी', 'वंदे मातरम', 'अखंड','गहराई', 'जज्बा' , 'मुक्ति','प्रेम' , 'गुड नाईट', 'फॉंसी दि कॅपिटल पनिशमेंट', 'मुंबई टॅक्सी सर्विस', 'शोमैन', 'चाय गर्म' ,'शूटर' यांसाखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेच नाहीत.
या चित्रपटांनी मिळवून दिली नवी ओळख -
'धडकन', 'बलवान', 'मोहरा',' हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'दिलवाले', 'बॉर्डर', 'रक्षक','विनाशक', 'शूट आउट अॅट लोखंडवाला', यांसारख्या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टीने केलेलं काम वाखाणण्याजोगं आहे.