रश्मिकानंतर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:07 IST2025-02-03T16:02:02+5:302025-02-03T16:07:27+5:30

बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटामुळे कायमच चर्चेत येत असतो.  

bollywood actor varun dhawan nephew anjini dhawan entry in salman khan sikander movie | रश्मिकानंतर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

रश्मिकानंतर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

Salman Khan Sikandar Movie: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटामुळे कायमच चर्चेत येत असतो.  लवकरच सलमान  त्याच्या आगामी 'सिकंदर' हा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. 'सिकंदर' मध्ये रश्मिका मंदाना, शरमन जोशी आणि काजल अग्रवाल यांसारखे कलाकार दिसणार आहेत. आता या यादीत नवीन नाव जोडलं गेल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेता वरुण धवनची ( Varun Dhawan) पुतणी अंजिनी धवनची या चित्रपटात वर्णी लागली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता  निर्माण झाली आहे. 

कोण आहे अंजिनी धवन?

अंजिनी धवन ही बॉलिवूड अभिनेता वरुण धनवची पुतणी आहे. अंजिनी तिच्या फोटोशूटमुळे किंवा तिच्या स्टाईलमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये येते. अंजिनीने 'बिन्नी अ‍ॅंड फॅमिली' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आता अंजिनीची थेट सलमानच्या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "आता टीझर आला आहे.तर मी याबद्दल बोलू शकते. या शिवाय आणखी काय पाहिजे. मी जेव्हा सेटवर जाते तेव्हा स्वत: लाच चिमटा काढते, हे खरंच असं घडतंय की मी स्वप्न पाहते असं मला वाटतं."

पुढे अंजिनी म्हणाली, "मी लहाणपणापासूनच सलमानची फॅन आहे. मला त्यांचे सिनेमे विशेष म्हणजे त्यांनी डेविड धवन यांनी दिग्दर्शित केलेले'पार्टनर','मुझसे शादी करोगी' हे सिनेमे मला आवडतात. जर मला कधी नर्व्हस वाटलं तर मी पार्टनर नक्की पाहते."

दरम्यान, सिकंदर या सिनेमाचे दिग्दर्शन ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए आर मुरगूदास यांनी केले आहे. सिकंदर’मध्ये अभिनेता सलमान खानसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. 

Web Title: bollywood actor varun dhawan nephew anjini dhawan entry in salman khan sikander movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.